पित्तशमनासाठी...

उन्हाळा आला, की अंगाची जळजळ, घामाच्या धारांमुळे होणारी अस्वस्थता आणि पित्त वाढल्याने डोकेदुखी, ॲसिडिटी आणि चिडचिड वाढते.
yoga
yogasakal
Updated on

- सायली शिंदे, योगतज्ज्ञ

उन्हाळा आला, की अंगाची जळजळ, घामाच्या धारांमुळे होणारी अस्वस्थता आणि पित्त वाढल्याने डोकेदुखी, ॲसिडिटी आणि चिडचिड वाढते. अशा वेळी योग्य आहार, संतुलित व्यायाम आणि थंडावा देणारी दिनचर्या, यामुळे पित्तावर नियंत्रण मिळवता येतं. चला, यावर्षी थोडा वेगळा विचार करून हे सगळं समजून घेऊया!

दिनचर्येत करा बदल

  • सकाळी लवकर उठा (पाच ते सहा वाजता) : सूर्योदयाच्या आधी उठल्याने शरीरातील पित्त संतुलित राहते.

  • कोमट नव्हे, थंडसर पाणी प्या : दिवसाची सुरुवात एक ग्लास गुलकंद किंवा बेलसरबताने करा - यामुळे शरीराला आतून थंडावा मिळतो.

  • हलका व्यायाम : हार्डकोर वर्कआउट टाळा. त्याऐवजी प्राणायाम, स्ट्रेचिंग, शांत योगासनांवर भर द्या.

  • दुपारची झोप टाळा : दिवसा झोपल्याने पचन मंदावते, पित्त वाढते. याऐवजी संध्याकाळी हलकासा ब्रीदिंग ब्रेक घ्या.

  • रात्री हलका आहार : ताकभात, मूगडाळ खिचडीसारखा हलका आहार घ्या.

पित्तशमन करणारी योगासनं

सुप्त बद्धकोनासन : पाठीवर झोपा, तळहातांनी पायाचे तळवे जोडून घ्या. गुडघे बाजूला पसरू द्या आणि खोल श्वास घ्या.

फायदे : उष्णतेमुळे होणारी पचनसंस्थेची तक्रार कमी होते, मन शांत राहतं.

शीतली प्राणायाम : जीभ बाहेर काढून पानाच्या आकारात वाकवा, तोंडातून श्वास आत घ्या आणि नाकातून सोडा.

फायदे : शरीराचं तापमान कमी होतं, उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी, घामाच्या तक्रारी कमी होतात.

पवनमुक्तासन : पाठीवर झोपा, एक गुडघा छातीला लावून धरावा. मग दुसरा पाय सरळ ठेवावा. दोन्ही पायांसाठी प्रत्येकी तीस सेकंद करा.

फायदे : पचन सुधारतं, गॅस कमी होतो आणि पित्ताचा त्रास दूर होतो.

अर्ध मत्स्येन्द्रासन : पाय पुढे लांबवा, एक पाय दुसऱ्या पायाच्या बाहेर ठेवा आणि कंबरेला वळण द्या.

फायदे : पचनसंस्था सुधारते, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.

वज्रासन : गुडघ्यावर बसा आणि पाठीला ताठ ठेवा. हात गुडघ्यांवर ठेवा आणि पाच मिनिटे खोल श्वास घ्या.

फायदे : अन्न पचनाला मदत, ॲसिडिटी कमी, आणि पित्त संतुलन साधलं जातं.

‘रेनबो रुटिन’

  • रविवार : बेल सरबत

  • सोमवार : गुलकंद दूध

  • मंगळवार : ताक + पुदिन्याची पेस्ट

  • बुधवार : कैरी पन्हे

  • गुरुवार : द्राक्ष सरबत

  • शुक्रवार : कोकम सरबत

  • शनिवार : पन्हे + साजूक तूप

थंडावा देणारी पित्तशामक प्लेट

अर्धा भाग : हिरव्या पालेभाज्या - दुधी, पडवळ, पालक. पाव भाग : थंड धान्य - ज्वारी, तांदूळ, नाचणी. पाव भाग : पित्तशामक फळं - द्राक्षं, पेरू, पपई.

एक चमचा : साजूक तूप

पित्तकूल स्नॅक्स

सकाळ : गुलकंद आणि वेलची घातलेलं थंड दूध. दुपार : काकडी आणि पुदिन्याच्या डिपसोबत सॅलड. संध्याकाळ : दही-चणा चाट.

थंड झोपेसाठी

झोपण्यापूर्वी पायांना गुलाबपाणी आणि तूप लावणे; उशाजवळ पुदिन्याच्या पानांची पिशवी ठेवणे; रात्री झोपताना ‘शीतली प्राणायाम’ करून शरीर शांत करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com