esakal | स्मार्ट शूज! अंध व्यक्तींना मिळणार मार्गातील अडथळ्यांचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट शूज! अंध व्यक्तींना मिळणार मार्गातील अडथळ्यांचे संकेत

स्मार्ट शूज! अंध व्यक्तींना मिळणार मार्गातील अडथळ्यांचे संकेत

sakal_logo
By
शर्वरी जोशी

दररोज प्रवास करत असतांना आपल्या आजुबाजूला असंख्य लोकांचा वावर असतो. यात सर्वसामान्यांप्रमाणेच काही दिव्यांग व्यक्तीही पाहायला मिळत. यामध्ये दृष्टीहीन (blind) व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी वावरत असतांना येणाऱ्या अडचणीदेखील आपण पाहत असतो. त्यामुळेच प्रवासादरम्यान, या अंध व्यक्ती कायम वॉकिंग स्टीकचा वापर करत असतात. या वॉकिंग स्टीकमुळे त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांचा त्यांना अंदाज येतो. परंतु, दररोज ही स्टीक घेऊन फिरण्यापेक्षा जर पायातल्या बुटांनीच समोर येणाऱ्या अडथळ्यांचे संकेत दिले तर? हो. हे शक्य झालं आहे. एका प्रसिद्ध कंपनीने खास अंध व्यक्तींसाठी स्मार्ट बूट (shooes) तयार केले आहेत. (blind-people-obstacles-smart-shooes)

ऑस्ट्रियामधील टेक इनोव्हेशन या कंपनीने अंध व्यक्तींसाठी स्मार्ट बूट तयार केले आहेत. टेक इनोव्हेशन कंपनीने ऑस्ट्रियाच्या ग्राज युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीसोबत भागीदारी करून या शूजची निर्मिती केली आहे. इनोमेक असं या बुटांचं नाव असून हे बूट घातल्यानंतर अंध व्यक्तींना चार मीटर अंतरापर्यंत मार्गात असणाऱ्या अडथळ्यांचा अंदाज लावता येणार आहे.

हेही वाचा: Fact Check : कोविड व्हॅक्सिन घेतल्यावर दोन वर्षात होतो मृत्यू?

इनोमेक हे स्मार्ट शूज तयार करतांना त्याच्यात अल्ट्रासोनिक सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जर मार्गात एखादा अडथळा असेल तर तो ब्लू -टूथच्या माध्यमातून स्मार्टफोनवर त्याचा अलार्म देईल. ज्यामुळे बूट वापरणारी व्यक्ती सतर्क होईल.

दरम्यान, या बूटांमुळे वाटेत येणाऱ्या गाड्या, इमारती किंवा एखाद्या अवजड वस्तू वा वाहनाची लगेच वापरकर्त्याला जाणीव होईल. परंतु, हे बूट प्रचंड महाग असून ते खरेदी करणं प्रत्येकालाच शक्य नाही.