Bone Health Tips :  म्हातारपणी हाडं खिळखिळी व्हावला नको असतील, तर हे पदार्थ खाणं आजचं बंद करा!

या कारणांमुळे काही वयोवृद्ध व्यक्तींना हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो
Bone Health Tips
Bone Health Tipsesakal

Bone Health Tips :

आपल्या संपूर्ण शरीर हाडांवर आधार असतो. हाडांमुळेच आपण सरळ उभे राहू शकतो. जन्मापासून पौगंडावस्थेपर्यंत हाडे तयार होत राहतात. 20 वर्षांच्या आसपास नवीन हाडे तयार होणे थांबते. पण त्याची ताकद आवश्यक आहे.

हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन डी यासह अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. या गोष्टींची कमतरता असल्यास हाडांतून कॅल्शियम बाहेर पडू लागते. यामुळे हाडे कमकुवत होतील आणि हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढेल.

ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाच्या NHS या वेबसाईटने संशोधनाचा हवाला देत म्हटले आहे की, तरुणाईमध्ये व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचे जास्त सेवन केल्यास वृद्धापकाळात हाडे तुटण्याचा धोका लक्षणीय वाढतो. अनेकदा या कारणांमुळे काही वयोवृद्ध व्यक्तींना हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो.

Bone Health Tips
Drumstick Benefits For Bone :हाडांचे दुखणे मिनिटात दूर करेल ही शेंग; फरक बघायचा असेल तर नक्की ट्राय करा

हे पदार्थ खाणे कमी करा

मासे

मासे हे आरोग्यासाठी चांगले अन्न आहे परंतु काही माशांमध्ये खूप जास्त तेल असते. म्हणजेच माशांच्या काळीजामध्ये भरपूर चरबी असते. या चरबीपासून तेल काढले जाते. माशांचे तेल बाजारात वेगळे उपलब्ध आहे जे अनेक रोगांवर वापरले जाते.

पण जर तुम्ही असे मासे जास्त खाल्ले ज्यात जास्त तेल असेल तर त्यामुळे लगेच नुकसान होत नाही पण वाढत्या वयात हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. NHS च्या मते, फिश लिव्हर ऑइल नंतर ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढवेल.

Bone Health Tips
Bones Health : या गोष्टी खाल्ल्याने हाडे होतील कमकुवत

प्राण्यांचे काळीज

बहुतेक लोक प्राण्यांचे काळीज खातात. प्राण्याचे काळीज जास्त प्रमाणात सेवन करू नये कारण यामुळे वृद्धापकाळात हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. या प्राण्याच्या यकृतामध्ये भरपूर व्हिटॅमिन ए असते. थोडेसे खाल्ल्याने कोणताही परिणाम होत नाही, परंतु प्राण्यांचे यकृत नियमितपणे खाल्ल्यास म्हातारपणात हाडे मोडण्याचा धोका वाढतो.

अंडी

अंडी हा एक अतिशय पौष्टिक घटक आहे पण त्याचे जास्त सेवन केल्याने हानी देखील होऊ शकते. आजकाल बहुतेक शहरी लोक तरुण वयात जिममध्ये जातात. आणि या काळात ते भरपूर अंडी खातात. पण हे करू नये. अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन ए चे अति प्रमाणात सेवन नंतर हाडांच्या फ्रॅक्चरसाठी कारणीभूत ठरू शकते. दिवसातून फक्त दोन ते तीन अंडी खावीत.

Bone Health Tips
Bone Health: वयाची चाळीशी ओलांडली की तुटू लागतात शरीरातील हाडे, आजपासूनच खायला घ्या ‘हे’ पदार्थ!

दररोज किती व्हिटॅमिन ए आवश्यक आहे

शरीराला सर्व प्रकारच्या पोषक तत्वांची संतुलित प्रमाणात गरज असते. प्रौढ व्यक्तीला दररोज 1.5 मिलीग्राम किंवा 1500 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन ए आवश्यक असते. यापेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए हानी पोहोचवू शकते कारण व्हिटॅमिन ए पाण्यात विरघळत नाही.

Bone Health Tips
Women Bone Health : तिशीनंतर महिलांची हाडे का कमकुवत होतात? महिलांनी अशी राखावी हाडांची निगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com