'प्रायव्हेट जेट' ऐकलं असेल पण संपूर्ण रेल्वे ट्रेन बुक करता येते! भारतीय रेल्वेची खास 'FTR' सुविधा...

Book a Full Train!: मोठ्या कुटुंबासह प्रवास किंवा डेस्टिनेशन वेडिंगसाठी रेल्वेची खास ऑफर; बुकिंग रद्द झाल्यास रिफंडचे नियम काय? जाणून घ्या सविस्तर
Reserve a Full Train Coach!

Reserve a Full Train Coach!

esakal 

Updated on

Rent an Entire Train Coach!: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जायचे असो, मोठी कौटुंबिक धार्मिक यात्रा असो वा कॉर्पोरेट ट्रिप, आता प्रवाशांना थेट रेल्वेचा डबा किंवा अख्खी ट्रेन बुक करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. अलीकडेच फर्स्ट एसी कूपेमध्ये नवविवाहित जोडप्यासाठी केलेल्या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या सुविधेबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मात्र रेल्वेने स्पष्ट केले की डब्याची सजावट करण्यासाठी बाहेरील व्यक्तीला परवानगीशिवाय प्रवेश देणे नियमबाह्य आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.

भारतीय रेल्वेच्या 'Full Tariff Rate' (FTR) योजनेअंतर्गत प्रवाशांना ही खास सुविधा दिली जात आहे. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सुविधा 'वेस्टर्न रेल्वे'च्या (Western Railway) स्थानकांवरून सुरू होणाऱ्या प्रवासासाठी ऑनलाइन उपलब्ध करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com