

Mercury fairness cream health risks and kidney damage awareness after Maharashtra ban
sakal
Fairness Cream Kidney Damage Early Warning Signs: चेहरा उजळवण्याच्या नादात तुम्ही नकळत किडनीला धोका तर पोहोचवत नाही ना? महाराष्ट्र सरकारने पारा (Mercury) असलेल्या काही फेअरनेस क्रीमवर बंदी घातल्यानंतर या उत्पादनांच्या सुरक्षिततेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. त्वचा गोरी करण्याचे दावे करणाऱ्या काही क्रीममधील घातक रसायने किडनीचे गंभीर नुकसान करू शकतात, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. नेमका हा धोका कसा निर्माण होतो आणि कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत, जाणून घ्या.