Car Engine च्या या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष, अचानक बंद पडेल कार

कारच्या इंजिनमध्ये बिघाड होण्यापूर्वी इंजिन Engine आपल्या काही संकेत देत असतं. मात्र हे संकेत आपल्या लक्षात येत नाहीत. तर काही वेळी आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. यामुळे अचानक कारचं इंजिन सीज होवू शकतं
Car Engine चे सिग्नल
Car Engine चे सिग्नलEsakal

कारमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कारचं इंजिन. इंजिन हे कारचं हृदय असल्याचं म्हणायला हरकत नाही. कारच्या इंजिनमध्ये Car Engine एखादा बिघाड निर्माण झाल्यास तुम्हाला कधीही प्रवासामध्ये मोठी अडचण निर्माण होवू शकते. यासाठीच कारच्या इंजिनची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. Car Care Tips Keep Eye on Engine Signals on dashboard

कारच्या इंजिनमध्ये बिघाड होण्यापूर्वी इंजिन Engine आपल्या काही संकेत देत असतं. मात्र हे संकेत आपल्या लक्षात येत नाहीत. तर काही वेळी आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. यामुळे अचानक कारचं इंजिन सीज होवू शकतं. यामुळेच या संकेतांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे संकेत कोणते ते जाणून घेऊयात. Car engine seize

इंजिनमधून आवाज येणं

जेव्हा तुम्ही कार इंजिन स्टार्ट करता तेव्हा इंजिनचा एक ठराविक आवाज येतो. या आवाजाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला इंजिनचा आवाज कमी-जास्त किंवा काहीसा वेगळा येत असल्याचं जाणवल्यास एकदा इंजिन तपासून घेणं गरजेचं आहे. अन्यथा ड्रायव्हिंग Driving करत असताना इंजिन अचानक तुम्हाला दगा देऊ शकतं.

व्हायब्रेशन

ड्रायव्हिंग करत असताना कारचं इंजिन जास्त व्हायब्रेट होत असल्याचं लक्षात येताच याकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे देखील इंजिन सीज होवू शकतं. इंजिन जास्त व्हायब्रेट होत अल्यास त्यात बिघाड निर्माण झाल्याचं लक्षात घ्यावं.

ओव्हरहिटिंग

कारमध्ये ओव्हरहिटिंगमुळे देखील इंजिनमध्ये एखाद बिघाड निर्माण होवू शकतो. यासाठी कुलंटकडे देखील लक्ष द्या.

हे देखिल वाचा-

Car Engine चे सिग्नल
Car Care Tips : गाडीतील Engine Oil बदलणं का आहे गरजेचं?

इंजिन लॉक होणं

जेव्हा कारचं इंजिन सीज होत तेव्हा कार चालवताना ते लॉक होवू शकतं. नव्या तंत्रज्ञानामुळे अशा स्थितीत कारमधील काही भाग ऑटोमॅटिक कार बंद करते. ज्यात एसी, म्युझिक सिस्टम, लाईट काम काम करणं बंद करतात. तसंच कारच्या स्पीडवरही परिणाम होतो. कार जास्त स्पीडमध्ये चालत नाही.

कारमधील इंधन

कारमध्ये अत्यंत कमी प्रमाणात इंधन असताना कार चालवल्यास इंजिनवर दबाव निर्माण होवून इंजिनमध्ये बिघाड होण्याची तसंच इंजिनचं लाइफ कमी होण्याची शक्यता वाढते. तसंच यामुळे कारचं इंजिन सीज होऊ शकतं. यासाठीच कारचा फ्य़ूएल टँक कायम ५० टक्क्यांहून जास्त असेल याची काळजी घ्या.

डॅशबोर्ड सिग्नल

कारच्या डॅशबोर्डवर विविध लाइट्स आणि आयकन असतात. कार स्टार्ट केल्यानंतर काही सेकंदांसाठी हे आयकन विविध रंगांमध्ये ब्लिंक होतात. या सिग्नलकडे लक्ष द्या. या वॉर्निंग लाइटद्वारे इंजिनमध्ये बिघाड असल्यास संकेत दिले जातात. इंजिनसाठीची वॉर्निंग लाइट दिसल्यास त्वरित कार सर्विस सेंटरला नेऊन इंजिनची तपासणी करा.

इंजिन सीज होण्याची कारणं

इंजिनचा टायमिंग बेल्ट किंवा चेन तुटल्याने इंजिन सीज होवू शकतं.

कारच्या सिलेंडरमध्ये पाणी गेल्यास पिस्टन डॅमेज होवून इंजिन सीज होवू शकतं.

जास्त पावसात किंवा जास्त पाण्यात गाडी चालवल्याने कारच्या बोनटमध्ये पाणी गेल्य़ाने इंजिन सीज होवू शकतं.

काही वेळेस भेसळयुक्त पेट्रोल किंवा डिझेलच्या वापरामुळे देखील कारचं इंजिन सीज होवू शकतं.

हे देखिल वाचा -

Car Engine चे सिग्नल
Jacqueline Fernandez Car: आलियानंतर आता जॅकलिनच्या कारची होतेय चर्चा! लक्झरी इलेक्ट्रिक काराची किंमत ऐकून बसेल शॉक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com