Driving Tips : चांगलं मायलेज हवंय? मग या गियरमध्ये चालवा कार? Perfect Driving साठी महत्वाच्या टिप्स

जर एखादी व्यक्ती जास्त मायलेज मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धातीने कार चालवत असेल किंवा गियरचा वापर करत असेल तर मायलेज तर मिळणार नाहीच, शिवाय कारच्या गियरबॉक्समध्ये बिघाड निर्माण होवू शकतो
चांगल्या मायलेजसाठी
चांगल्या मायलेजसाठीEsakal

कार खरेदी करताना किंवा कार खरेदी केल्यानंतर प्रत्येकालाच आपल्या कारने चांगला मायलेज Milage द्यावं अशी इच्छा असते. चांगलं मायलेज म्हणजेच एकंदर कमीत कमी इंधनामध्ये कारने जास्त किलोमीटर अंतर गाठणं. Car Driving Tips in Marathi how to get good milage while driving

यामुळे इंधनाच्या खर्चामध्ये Fuel Expenses मोठी बचत होते. मायलेज वाढवण्यासाठी मग अनेकजण इतरांनी सांगितलेल्या विविध टिप्स एकून त्यानुसार कार ड्राइव्ह Car Driving करण्यास सुरुवात करतात.

मात्र अनेकदा काही चुकीच्या सल्ल्यांमुळे जर तुम्ही चुकीच्या पद्धातीने कार चालवून जास्त मायलेज मिळवण्याचा प्रयत्न करू लागतात.

काहींच्या मते टॉप गियरमध्ये कार चालवल्यास जास्त मायलेज मिळतं, तर काहींच्या मते चौथ्या गियरमध्ये कार चांगलं मायलेज देते. नेमक्या कोणत्या गियरमध्ये कार चालवल्याने कार चांगलं मायलेज देते असा प्रश्न अनेकांना कायम सतावत असतो.

जर एखादी व्यक्ती जास्त मायलेज मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धातीने कार चालवत असेल किंवा गियरचा वापर करत असेल तर मायलेज तर मिळणार नाहीच, शिवाय कारच्या गियरबॉक्समध्ये बिघाड निर्माण होवू शकतो. एवढचं नव्हे तर कारच्या क्लच प्लेट आणि इंजिनदेखील खराब होवू शकतं. यासाठीच गियरचं योग्य टेक्निक समजून घेणं गरजेचं आहे.

सर्वप्रथम कार गियरमुळे नव्हे तर तुमच्या कारच्या स्पीडच्या हिशोबाने मायलेज देत असते हे समजून घेणं गरजेचं आहे. यासाठीच ड्रायव्हिंग करताना गियर हे कारच्या स्पीडनुसार बदलणं गरजेचं आहे. अर्थात कोणत्या स्पीडला किंवा कोणत्या परिस्थितीत कितव्या गियरमध्ये कार चालवावी हे समजून घेणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

चांगल्या मायलेजसाठी
Fuel Tips : सिग्नलला गाडीचं इंजिन सुरू ठेवावं की बंद?

गियर, स्पीड आणि मायलेजचं गणित

कार ड्राइव्ह करत असताना तुम्हाच्या कारच्या स्पीडनुसार किंवा तुम्हाला ज्या स्पीडला कार चालवायची आहे त्यानुसार गियर बदलणं गरजेचं आहे. कार सुरू करण्यासाठी पहिल्या गियरचा वापर केला जातो. पहिला गियर हा सर्वात जास्त पावरफुल असल्याने या गियरमध्ये सगळ्यात जास्त इंधन खर्च होतं. त्यामुळे पहिल्या गियरमध्ये सर्वात कमी मायलेज मिळतं.

यानंतर तुम्ही 20 किमी प्रतितास वेगाने दुसऱ्या गिअरवर शिफ्ट करू शकता. तर ३५ ते ४० किलोमीटर ताशी वेगासाठी तिसरा गियर आणि आणि ४० ते ५० किमी ताशी वेगासाठी चौथ्या गियरमध्ये शिफ्ट करा.

५० हून जास्त स्पीडवर कार चालवत असताना ५व्या गियरचा वापर करावा. पाचव्या गियरमध्ये सर्वात कमी पाॅवर असल्याने हा गियर जास्त स्पीडसाठी वापरणं फायद्याचं ठरतं. यामुळे इंजिनवरही लोड येत नाही शिवाय या गियरमध्ये जास्त स्पीडला कार चालवल्यास सगळ्यात चांगलं मायलेज मिळतं.

हे देखिल वाचा-

चांगल्या मायलेजसाठी
Petrol Pump वर 0.00 चेक करण्याच्या नादात या स्कॅमकडे कोणाचंच लक्ष नसतं, तुम्हीही हीच चूक करता काय?

असं मिळवा जास्त मायलेज

सिटी ड्राइव्ह करत असताना स्लो मुव्हिंग ट्राफिक असल्याने कार कमी स्पीडवर चालवावी लागते. अशा वेळी तुम्ही टॉप गियरमध्ये कार कमी स्पीडमध्ये चालवली तर कारच्या इंजिनवर लोड येवू शकतो. यासाठीच सिटी ड्राइव्ह करताना कार तिसऱ्या गियरवर चालवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला चांगलं मायलेज मिळेल.

तर हायवेवर कार चालवत असताना तुम्ही टॉप गियरचा वापर करू शकता. हायवेवर बराचवेळी एकाच स्पीडवर कार चालवण्याच्या संधी मिळते. अशावेळी तुम्ही ५व्या गियरमध्ये ८०च्या वर कार चालवू शकता आणि बेस्ट मायलेज मिळवू शकता.

मायलेज वाढवण्यासाठी घ्या गोष्टी देखील महत्वाच्या

- कारचं मायलेज वाढवण्यासाठी स्पीड आणि गियर यांसोबत काही इतर गोष्टी देखील महत्वाच्या असतात. त्यामुळे या गोष्टींची दखल घेणं गरजेचं आहे.

- एअर फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करणं आणि बदलणं गरजेचं आहे. याचा तुमच्या इंजिनच्या कार्यप्रणालीवर परिणाम होत असतो.

- टायर प्रेशर कायम तपासा. याचा तुमच्या मायलेजवर मोठा परिणाम होत असतो.

- नियमितपणे इंजिन ऑइल बदला.

- विनाकारण सतत गियर बदलू नका. यामुळे गियरबॉक्स खराब होण्यासोबतच मायलेजवरही परिणाम होतो.

या काही टिप्स फॉलो करून तुम्ही कारचं मायलेज वाढवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com