कारमधील Air Bags योग्य काम करतात का, कसं ओळखाल?

कारमधील एअरबॅग या डॅशबोर्ड किंवा कारमधील बॉडीच्या आतील बाजुने असल्याने त्या डोळ्यांना दिसत नाहीत. शिवाय त्याची चाचणी घेणंही अशक्य असतं. अशात कारमधील एअरबॅग योग्य काम करतात की नाही हे कसं तपासावं, असा प्रश्न अनेकांना पडला असेल
कारमधल्या एअरबॅग्जचा मेंटेनन्स
कारमधल्या एअरबॅग्जचा मेंटेनन्सEsakal

कोणतीही कार खरेदी करत असताना सर्व प्रथम पाहिली जाते ती म्हणजे सिक्युरिटी अर्थात सुरक्षितता. कारची बनावट तसंच बॉडीसोबतच त्यातील सेफ्टी फिचर्स Safety Features पाहणं केव्हाही अधिक महत्वाचं ठरतं. Car Safety Features Marathi Know the Maintenance of your Car Air Bags

कारमधील सेफ्टीसाठी Car Safety सगळ्यात महत्वाच्या असतात त्या म्हणजे एअर बॅग्स Air Bags. सध्या भारतातमध्ये कोणत्याही कारला किमान २ एअरबॅग्स असणं कायद्याने बंधनकारक आहे.

येत्या काळात प्रत्येक कारसाठी ६ एअर बॅग्स अनिर्वाय करण्यावर सध्या सरकार विचार करत आहे.

अर्थात अनेक लक्झरी किंवा प्रिमियम कारमध्ये कंपनीकडून ४ किंवा ६ एअर बॅग्स देण्यात येतात. एअर बॅग्समुळे कोणत्याही अपघातावेळी कारमधील व्यक्तीचं संरक्षण Protection होण्यास मदत होते.

गेल्या काही वर्षात आपण अनेक अपघातांमध्ये एअरबॅग न उघडल्याने कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या किंवा त्यांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. त्यामुळे आपल्या कारमधील एअरबॅग योग्य काम करतात की नाही असा प्रश्न अनेकांना निर्माण होतो.

कारमधील एअरबॅग या डॅशबोर्ड किंवा कारमधील बॉडीच्या आतील बाजुने असल्याने त्या डोळ्यांना दिसत नाहीत. शिवाय त्याची चाचणी घेणंही अशक्य असतं. अशात कारमधील एअरबॅग योग्य काम करतात की नाही हे कसं तपासावं, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर एअरबॅगबद्दल तुम्हाला जाणून घेण्यासाठी आम्ही तुमची मदत करणार आहेत.

हे देखिल वाचा-

कारमधल्या एअरबॅग्जचा मेंटेनन्स
Car Tyres वरील नंबर आणि कोडमध्ये लपलीये माहिती, जाणून घ्या कोडचं महत्व

जाणून घ्या एअरबॅग योग्य काम करतात की नाही

एअरबॅग योग्यरित्या काम करतात की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स वापराव्या लागतील. अर्थात यासाठी तुम्हाला कारच्या के इंस्ट्रूमेंट क्लस्टरकडे लक्ष द्यावं लागेल. या क्लस्टवर अनेक सांकेतिक लाइट दिसत असतात. कारमधील विविध फंक्शनची माहिती यावरून मिळते.

कार स्टार्ट करताच इंस्ट्रूमेंट क्लस्टर वर ‘एसआरएस’ किंवा एअरबॅगची चेक लाईट ऑन होते. एक बसलेली व्यक्ती आणि तिच्यासमोर गोल अशा प्रकारची ही चेक लाईट असते.

कारचं इग्निशन ऑन करताना ही लाईट ऑन होते. मात्र, तुम्ही कार चालवायला सुरुवात करताच ही लाईट बंद होते. असं झाल्यास कारमधील एअरबॅग योग्यरित्या काम करत आहेत असं समजावं.

मात्र, कार चालवू लागल्यानंतर देखील ही चेक लाइट ऑन राहिल्यास एअरबॅगमध्ये काहीतरी बिघाड आहे असं समजावं. यानंतर वेळ वाया न घालवता लगेचच सर्व्हिस सेंटरला जाऊन कारची तपासणी करून योग्य ती दुरूस्ती करून घ्यावी.

तुम्हाला हे देखील माहित असणं गरजेचं

कारमधील एअरबॅग या जर तुम्ही सीट बेल्ट लावला असले तरच उघडतात. त्यामुळे कार चालवत असताना सीड बेल्ट लावणं गरजेचं आहे. अन्यथा एखादा अपघात घडल्यास जर एअरबॅग असूनही त्या उघडणार नाहीत.

तसंच जर तुम्ही एखादी जुनी कार खरेदी करत असाल, तर ती एखाद्या मॅकेनिक कडून योग्यरित्या तपासून घ्या. अनेकदा कारमध्ये काही बदल करण्यात आले असल्यास किंवा त्या कारचा अपघात झाला असेल आणि ती पुन्हा दुरुस्त करण्यात आली असेल तर एअरबॅग बद्दलची माहिती घेणं गरजेचं आहे.

गाडी एखाद्या वाहनाला अथवा दुर्घटनेत आदळल्यास एअरबॅगमुळे डोक्याचं आणि छातीच्या भागाचं रक्षण होतं. यामुळे गंभीर दुखापत टळते. यासाठीच कारमधील एअरबॅग योग्य फंक्शन करत आहेत का हे जाणून घेणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

कारमधल्या एअरबॅग्जचा मेंटेनन्स
Driving Tips: तुम्ही देखील पावसामध्ये कार चालवताना Hazard Light ऑन ठेवताय? मग जाणून घ्या योग्य माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com