esakal | उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुदिनाचा वापर करून केसांची अशी घ्या काळजी

बोलून बातमी शोधा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुदिनाचा वापर करून केसांची अशी घ्या काळजी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुदिनाचा वापर करून केसांची अशी घ्या काळजी

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. अशा वेळी पुदिना चा वापर करून आपण केसांना आवश्यक ती पोषक तत्वे देऊ शकतो.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेबरोबरच केसांनाही अनेक वेळा नुकसान पोहोचते. खासकरून कडक उन, धूळ आणि येणारा घाम यामुळे आपल्यास स्काल्पवर इन्फेक्शन आणि अन्य समस्या निर्माण होतात. अशावेळी आपल्या केसांसाठी अधिक काळजी घेणे आवश्यक ठरते. या ऋतू मध्ये आपल्या आहाराबरोबरच हेअर केअर रुटीन मध्ये पुदिनाचा समावेश करू शकता. त्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात जे केसांना सुरक्षितता पोहोचवतात आणि उन्हाळ्यातील अनेक समस्या पासून वाचवते. पुदिन्याचा वापर करून केसांची काळजी कशी घ्यावी याबाबतची माहिती या ठिकाणी देणार आहोत.

पुदिना मध्ये असणारे पोषक तत्वे

पुदिना अँटीसेप्टिक असते.

यामध्ये अँटीइन्फ्लामेंट प्रॉपर्टीज असतात.

पुदीना अँटीमायक्रोबियल गुणाने समृद्ध असते. यामध्ये विटामिन सी, झिंक आणि आयर्न असे पोषक तत्व असतात.

पुदिनामध्ये मेंथॉल आणी सेलेनियम भरपूर प्रमाणात असते.

पुदिना चा हेअर मिस्ट

साहित्य

एक कप पुदिन्याचे पाणी,

पाच थेंब रोजमेरी इसेन्शियल ऑइल,

एक मोठा चमचा खोबरेल तेल.

कृती

सुरुवातीस एक मुठभर पुदिन्याची पाने दोन कप पाण्यामध्ये उकळून घ्या. पाणी एक कप होईपर्यंत त्याला उकळा. त्यानंतर हे मिश्रण काढून त्याला थंड करा. जेव्हा पुदिन्याचे पाणी गार होईल तेव्हा त्यामध्ये खोबरेल तेल आणि रोजमेरी इसेन्शियल ऑइलचे थेंब टाका .आता हे मिश्रण एका स्प्रे बॉटल मध्ये घाला आणि स्काल्प वर स्प्रे करून हळूवार मसाज करा तुम्ही या मिस्ट चा वापर रात्री झोपण्यापूर्वी करू शकता त्यानंतर केस धुवा.

पुदिन्याचे हेअर पॅक

आवश्यक साहित्य

एक कप दही,

एक मोठा पुदिन्याची पेस्ट

कृती

एका बाऊलमध्ये दही घ्या. त्यामध्ये पुदिन्याची पानांची पेस्ट घाला. तयार झालेले होम मेड हेअर पॅक केसांच्या मुळापासून सर्वत्र लावा. 45 मिनिटानंतर केस धुऊन घ्या.

पुदिन्याचा शांपू

सहित्य

एक कप पुदिन्याचा रस,

शाम्पू जरुरीनुसार

कृती

पुदिन्याची पाने चेचून त्यातून रस काढा. हा रस शांपू मध्ये मिक्स करा आणि केसांना लावा. जर तुम्हाला पुदिन्याचा रस नको असेल तर पाच थेंब मिंट ईसेंसेल ऑईल वापरू शकता.

केसांना पुदिना चे फायदे

जर तुमच्या केसांची वाढ चांगली नसेल तर तुम्ही केसांना पुदिना जरूर लावा. यामुळे केसांची वाढ चांगली होते.

अँटीफ्लक गुणामुळे पुदिना समृध्द आहे. आपल्या केसात कोंडा होण्यापासून वाचवतो.

जर तुमचे स्काल्प जास्त कोरडे राहत असेल आणि तुम्हाला केस गळतीची समस्या असेल तर पुदिना चा वापर जरूर करा. यामुळे केस गळती थांबेल.

कोणत्या प्रकारचा केसांना पुदिना लाभदायक

तुमचे केस ड्राय असतील अथवा तेलकट असतील पुदिना प्रत्येक केसांसाठी लाभदायक ठरते. तुम्ही याचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या केसांसाठी करू शकतात.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.