Colon Cancer Symptoms : तरूणांमध्ये कोलन कर्करोगाचा धोका वाढतोय? काय आहेत त्याची कारणं!

कोलन कर्करोगाची बहुतेक प्रकरणे अनुवांशिक मानली जातात
Causes Of Colon Cancer
Causes Of Colon Cancer esakal

Causes Of Colon Cancer : ऍसिडीटी, अपचन यामुळे वारंवार पोटदुखीचा त्रास होत असेल. तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. असं कोणी तुम्हाला बोललं तर काय असेल त्यावर विश्वास बसेल का. नाहीच. पण हे खरं आहे.

सध्या जगभरात कॅन्सरची प्रकरणे झपाट्याने पसरत आहेत. त्यात आता कोलन कॅन्सरच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. कोलन कर्करोग, ज्याला कोलोरेक्टल कर्करोग देखील म्हणतात, कोलनमध्ये होणारा मोठ्या आतड्याचा कर्करोग आहे.

हे आतडे पाण्याचे पचन आणि शोषण आणि शरीरातील विषारी पदार्थांचे निर्मूलन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कोलन कर्करोगाची नेमकी कारणे अद्याप माहित नसली तरी तरुण लोक त्यास अधिक असुरक्षित आहेत, जी चिंतेची बाब असू शकते.

Causes Of Colon Cancer
Sugar & Cancer : साखर खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो? अमेरिकेन रिसर्च कंपनीचा रिपोर्ट काय सांगतो?

कोलन कर्करोगाची कारणे

कोलन कर्करोगाची बहुतेक प्रकरणे अनुवांशिक मानली जातात. याशिवाय झपाट्याने वाढणारा लठ्ठपणा, लाल मांसाचे जास्त सेवन, धूम्रपान आणि अल्कोहोलचे अतिसेवन, साखरेचे जास्त सेवन आणि शौचाच्या बदलत्या सवयी यामुळेही कोलन कॅन्सरचे प्रमाण वाढू शकते.

 या कारणांमुळे मलाशयाच्या आतील भागातील निरोगी पेशी बदलू लागतात आणि नियंत्रणाबाहेर जाऊ लागतात, या बदलामुळे मोठ्या आतड्यात ट्यूमर तयार होतो, ज्याला कोलन कॅन्सर म्हणतात.

 कोलन कॅन्सरचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास ९० टक्के रुग्णांचे प्राण वाचू शकतात, परंतु कोलन कॅन्सरच्या लक्षणांविषयी जागरुकतेचा अभाव हे त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे कारण ठरू शकते. त्यामुळे त्याची सुरुवातीची चिन्हे व लक्षणे माहीत असणे आवश्यक आहे.

Causes Of Colon Cancer
Meat, Drinks Causes Cancer : आता पार्ट्या जरा जपून करा, दारूसोबत मांसाहारात सापडलेत कॅन्सरचे घटक...

कोलन कॅन्सरची लक्षणे कोणती?

वारंवार पोटात दुखणे

अचानक वजन कमी होऊ लागते.

कधी जुलाब तर कधी अचानक बद्धकोष्ठता

आतड्यांच्या हालचालींमध्ये गुदाशयात वेदना

आतड्यांसंबंधी हालचाल करताना रक्तस्त्राव होणे.

थकवा आणि अस्वस्थ वाटणे.

Causes Of Colon Cancer
Breast Cancer : या ६ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका; असू शकतो स्तनांचा कर्करोग

उपाय काय आहेत

आपल्या पोटाचे विकार वाढू लागतात त्याचे मूळ कारण असते आपण घेत असलेला चुकीचा आहार. त्यामुळे कोलन कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची काळीज गांभीर्याने घेतली गेली पाहिजे.

तुम्ही घेत असलेल्या आहारात साखर, मीठ आणि मैद्याचा वापर कमी करा. तुम्ही सतत जंक फूड आणि मसालेदार पदार्थ खात असाल ते वर्ज्य करा. फळे, हिरव्या भाज्या आणि सर्व प्रकारची व्हिटॅमिन तुमच्या आहारात कशी समाविष्ठ करत असाल ते नक्कीच फायदेशीर होईल. दारु आणि धुम्रपान करत असाल तर तेही टाळा, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही रोज व्यायाम करा.

Causes Of Colon Cancer
National Cancer Institute : संघाची टीम चांगलं काम करत आहे - मोहन भागवत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com