Viral Video : महाकाय विषारी कोब्राचं थरारक रेस्क्यू; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral Video Sakal

साप पाहिला की आपल्या अंगावर काटा येतो. तर अनेकदा प्रत्यक्षात साप पाहून आपल्या पायाखालची जमीन सरकते. पण सर्पमित्र अगदी कसलीही भिती न बाळगता सापाला पकडून योग्य त्या ठिकाणी सोडून देतात. सध्या एका कोब्राचे रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
Akshaya Tritiya 2023: उत्सव अक्षयदानाचा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील कोब्रा पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्याची लांबी आणि काढलेला फणा पाहून आपलीही घाबरगुंडी उडेल. जवळपास १० फूट लांबी आणि जाड कोब्रा हा पकडण्यासाठी सर्पमित्रालासुद्धा मोठी कसरत करावी लागली असून अनेकदा कोब्रा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com