Celebs Fashion : यंदाच्या सणात अर्पिता मेहतांचे कलेक्शन गाजणार ;पहा सिलेक्टीव्ह स्टाइल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Celebs Fashion

Celebs Fashion : यंदाच्या सणाला अर्पिता मेहतांचे कलेक्शन गाजणार ;पहा सिलेक्टीव्ह स्टाईल

पुणे : दसरा दिवाळीचा सिझन म्हणजे खरेदीचा सिझन हो. नवरात्री, दिवाळी आणि लग्नसराईचा हंगामही येत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला ट्रेंडी आणि पारंपरिक कपड्यांची गरज असते. बरं, यासाठी अनेक पर्याय आहेत. आजकाल, ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर भरपूर व्हरायटी आहे. पण जर तुम्हाला डिझायनर आणि ट्रेंडी असे काही हवे असेल. तर त्यासाठी तुम्ही अनेक डिझायनर्सनाही फॉलो करू शकता. जसे सब्यसाची, मनीष मल्होत्रा, गौरव गुप्ता, नीता लुल्ला, अनिता डोगरे किंवा अर्पिता मेहता यांचे कलेक्शन म्हणजे त्यात तुम्ही कडकच दिसणार.

हेही वाचा: Celebs Fashion : या अभिनेत्रींही ट्राय केलीय ‘टाय ऍन्ड डाय’ साडी ; फेस्टीव सिझनसाठी आहे परफेक्ट

सध्या मार्केटमध्ये नवीन काय आले आहे. याचा शोध घेत असाल तर चला तर मग आम्हीही या कामात तुमची थोडी मदत करतो. आज आम्‍ही तुम्‍हाला अर्पिता मेहतांच्‍या कलेक्‍शनमधले परफेक्ट ट्रॅडीशनल डिझाईन्स दाखवणार आहोत.फ्लोरल गार्डन प्रिंट असलेली ही रिपल साडी अर्पिताच्या न्यु कलेक्शनपैकी एक आहे. ही साडी सणासुदीच्या काळात नेसण्यासाठी सुंदर आणि फॅन्सी वाटते.

हेही वाचा: Go Fashion: गो फॅशनच्या शेअर्सने गाठला नवा उच्चांक, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?

फ्लेमिंग रेड ऍन्ड सँड गार्डन प्रिंट असलेली साडी आणि लेहेंगा दोन्ही खूप क्लासी लुक देतात. आजकाल रफल साडी खूप ट्रेंडमध्ये आहे. तर तिथे हा रफल लेहेंगा आणि त्याची चोली सणाच्या हंगामासाठी परफेक्ट आहेत.फेस्टीव्ह सिझन लक्षात घेऊनच ही साडी डिझाईन करण्यात आली आहे. कोकोनट हँड एम्ब्रॉयडरी साडी आणि त्यावर मल्टिपल थ्रेड्स आणि मिरर हँड एम्ब्रॉयडरीने ब्लाउज बनवण्यात आला आहे.

हेही वाचा: Fashion: ऑफीसमध्ये 'या' रंगाचे शर्ट दिसतात क्लासी

अर्पिताच्या कलेक्शनमधील ट्रॅडीशनल आणि कंटेम्पररी लूक देणारा मिंट ग्रीन फ्लोरल प्रिंट लहंगा आहे. त्यावर गोल्ड कलरचे ब्लाऊज अधिकच उठून दिसेल.फेस्टीव सिझनमध्ये शरारा सेट हा बेस्ट ऑप्शन आहे. काही वेगळी स्टायलिश स्टाईल करायची असेल तर साराची ही स्टाईलही कॉपी करू शकता. रेड कलरचा फुलांचा गुलाबी शरारा सेट ब्लाउजसोबत फॅन्सी लुक देतो.