Celebs Wedding Outfit : सगळे म्हणतील लग्नात करवलीच भारी! ट्राय करा हे सेलिब्रिटी आऊटफिट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Celebs  Wedding Outfit

Celebs Wedding Outfit : सगळे म्हणतील लग्नात करवलीच भारी! ट्राय करा हे सेलिब्रिटी आऊटफिट

Celebs Wedding Outfit : लग्नसराई सुरू झाली आहे; साधारण डिसेंबर जानेवारी मध्ये अनेक लोकं लग्न करतात, मुळात थंडीचे दिवस असल्याने पाऊसाची कटकट नाही आणि उन्हाने दमछाकही नाही म्हणून तर हा परफेक्ट वेडिंग सिझन असतो. तुमच्याही घरी लग्न असेलच, त्यात काही जवळच्या लोकांचेही असेलच. अशात नक्की कोणते ड्रेसेस घ्यावे असा प्रश्नही असेलच. शेवटी करवली आहात तुम्ही, तुम्ही टॉप क्लास दिसलंच पाहिजे. तुम्ही सेलिब्रिटींचे हे ड्रेसेस घेऊ शकतात. मुळात हे कितीही हेवी दिसत असले तरी कॅरी करणं खूप सोपे आहेत आणि ह्यात तुम्ही खूप सुंदर दिसाल.

हेही वाचा: Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

एथनिक जंपसूट:

हळदीच्या दिवशी नक्की कोणता ड्रेस घालायचा हा प्रश्न असतोच, तुम्ही हा एथनिक जंपसूट घालू शकतात. ट्रॅडिशनल टच सोबत याने तुमचा लूक स्टायलिश दिसेल.

केप सेट्स:

संगीत मध्ये डान्स तर तुम्ही करणारच असाल; यात एक कंफर्टेबल ड्रेस असेल तर जास्त चांगल. पण याने तुमचा लूक कमी ट्रेंडी दिसायला नको. तुम्ही अनन्य पांडेच्या या रॉयल ब्लू केप सेट ड्रेस घालू शकतात.

हेही वाचा: Tour Near Goa : गोव्याला जायचं प्लॅन करताय? त्याआधी वाटेतल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

लिलेक कलर:

जान्हवी कपूरच्या या ड्रेसची सध्या खूप चर्चा आहे. त्यामुळे लिलेक कलर या वर्षी खूपच ट्रेंडिंग आहे. तुम्ही लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा रिसेप्शनला हा ड्रेस घालू शकतात.

सिक्वीन्स:

लग्नाच्या दिवशी किंवा लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हा आऊटफिट कॅरी करू शकतात. रात्रीच्या लग्नासाठी तुम्ही ही साडी परफेक्ट असेल. याबरोबर तुम्ही साधे अमेरिकन डायमंडचे कानातले घालू शकतात.