Tour Near Goa : गोव्याला जायचं प्लॅन करताय? त्याआधी वाटेतल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tour Near Goa

Tour Near Goa : गोव्याला जायचं प्लॅन करताय? त्याआधी वाटेतल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

Tour Near Goa : एकदा तरी गोव्याला जायचं असा प्रत्येकाच्या मनातला प्लॅन असतो. आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर, भावंडांबरोबर, जोडीदारासोबत गोवा ट्रिप प्लॅनिंग तुम्हीही करत असलाच किंवा कधीतरी जाण्याचं स्वप्नही बघत असाल. पण गोव्याला जाण्याच्या वाटेत अशी काही ठिकाणं येतात जी बघितली तर बहुदा तुम्ही गोवा विसराल. ही ठिकाणं देखील खूप सुंदर निसर्गरम्य आणि पर्यटकांसाठी वेगळेच आकर्षण आहेत.

हेही वाचा: Goa Tour: नववर्षात गोव्याला जायचा प्लॅन आहे? तिकिटापासून ते पर्यटन स्थळांपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

1. हरवळे धबधबा

गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेला हरवळे धबधबा गोव्यातील सुंदर धबधब्यांपैकी एक आहे. या धबधब्याचे पाणी 50 मीटर उंच खडकांमधून खाली कोसळते. पावसाळ्यात या धबधब्याचे सुंदर दृश्य दिसते, जे पर्यटकांना अधिक आकर्षित करते. धबधब्याखाली एक मोठा तलाव आहे, इथे तुम्ही स्विमिंग करू शकतात. आजूबाजूला दाट हिरवळ आहे, त्यामुळे धबधब्याचे आजूबाजूचे दृश्य आणखीनच आकर्षक दिसते.

हेही वाचा: Misal Pav Recipe: रविवार स्पेशल नाश्त्याला बनवा  झणझणीत मिसळ पाव..

2. अग्वाडा किल्ला

उत्तर गोव्यात कांदोळी समुद्र किनार्‍यापासुन 4 किलोमीटर अंतरावर अग्वाडा किल्ला आहे. अग्वाडा किल्ल्याचे दोन भाग आहेत. वरील अग्वाडा किल्ला आणि खालील अग्वाडा किल्ला. अग्वाडा हा पोर्तुगीज शब्द आहे, ज्याचा अर्थ "पाण्याचा स्त्रोत" असा आहे. या किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीतून व्यापारी जहाजांवर पाणी भरले जात असे.

पोर्तुगिजनी एकोणीसाव्या शतकात या किल्ल्यावर तुरुंग बांधला. इसवीसन 2011 पर्यंत खालील अग्वाडा किल्ल्याचा उपयोग कारागृह म्हणुन केला जात होता. तुम्ही या किल्ल्याला सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30 वाजे पर्यंत भेट देऊ शकतात. किल्ल्याला भेट देण्यासाठी शुल्क आकारले जाते

हेही वाचा: Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

3. दूधसागर धबधबा

दूधसागर धबधबा भारतातील गोवा राज्यातील मांडोवी नदीवरील धबधबा आहे. हा धबधबा पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. हा भाग जैवविविधतेने संपन्न असलेल्या घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. या धबधब्याचे पाणी नेहमी दुधासारखे पांढरे स्वच्छ दिसत असल्याने त्याला हे नाव आहे. दुधसागर धबधबा बराच प्रसिद्ध असल्याने येथे दरवर्षी 8 ते 10 हजार स्थानिक तसेच विदेशी पर्यटक भेट देत असतात.

हेही वाचा: Winter Health Care: हिवाळ्यात चुकूनही सॉक्स घालून झोपू नका; होऊ शकतो हा त्रास...

4. वेल्साओ बीच

गोव्यातील सर्वात शांत आणि निर्जन समुद्रकिनाऱ्यांपैकी एक, वेल्साओ समुद्र. माजोर्डा समुद्रकिनाऱ्याच्या पुढे हा समुद्र आहे. या समुद्राची गंमत म्हणजे इथे कासवांची अंडी बघायला मिळतात. ऑगस्ट नंतर इथे समुद्रातली कासव येऊन अंडी घालत असतात.

हेही वाचा: Garlic Bread Sticks Recipe : काहीतरी मजेशीर खावस वाटत आहे? मग ट्राय करा, गार्लिक ब्रेड स्टिक्स

5. भगवान महावीर अभयारण्य आणि मोलेम नॅशनल पार्क

भगवान महावीर अभयारण्य आणि मोलेम नॅशनल पार्क हे 240 चौ. किलोमीटर संरक्षित क्षेत्र आहे जे पश्चिम घाटात, गोवा राज्यातील धारबांदोरा तालुक्यात, कर्नाटकच्या सीमेवर आहे.

या अभयारण्यात वेस्ट कोस्ट उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले, वेस्ट कोस्ट अर्ध-सदाहरित जंगले आणि आर्द्र पानझडी जंगले इथे आहेत. अनेक प्रकारच्या प्राचीन वनस्पती इथे बघायला मिळतात. अभयारण्यात अनेक बारमाही पाण्याचे स्त्रोत आहेत आणि पाण्याची उपलब्धता ही वन्यजीवांसाठी मर्यादित घटक नाही.