Chaitra Pornima : ज्योतिबा डोंगरावर आज गुलालाची उधळण, ज्योतिबा देवांची कट्यार अन् यमाई देवीचा विवाह सोहळा

चैत्र यात्रा म्हटलं की समस्त ज्योतिबा भक्तांच्या आनंदाला उधाण येतं
Chaitra Pornima : ज्योतिबा डोंगरावर आज गुलालाची उधळण, ज्योतिबा देवांची कट्यार अन् यमाई देवीचा विवाह सोहळा

Chaitra Pornima :

दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त आज लाखोंच्या संख्येने भाविक वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर उपस्थित आहेत. पाडवा झाला की भाविकांना चैत्र पौर्णिमेची ओढ लागते. कारण, दख्खनच्या राजाचा थाट आज पाहण्यासारखा असतो.

पण, आजच्या दिवशी भाविक सासनकाठी घेऊन देवाच्या दारी जातात. आणि तिथे राजा ज्योतिबा आणि यमाई देवींचा लग्नसोहळा होतो, अशी चुकीची भावना भाविकांमध्ये आहे, असे मग इतिहास अभ्यासक ऍड. प्रसन्न मालेकर यांनी सांगितले.

Chaitra Pornima : ज्योतिबा डोंगरावर आज गुलालाची उधळण, ज्योतिबा देवांची कट्यार अन् यमाई देवीचा विवाह सोहळा
Jyotiba Temple : 'चांगभलं'च्या गजराने जोतिबा डोंगर दुमदुमला; महाराष्ट्र, कर्नाटकसह गुजरातमधून तीन लाख भाविकांची हजेरी

चैत्र पौर्णिमेला खरे तर ज्योतिबा देवाची यात्रा आणि यमाई देवीच्या आणि जमदग्नींच्या लग्नाचा, आपण आज त्याची पौराणिक कथा काय आहे याबद्दल

चैत्र यात्रा म्हटलं की समस्त ज्योतिबा भक्तांच्या आनंदाला उधाण येतं. चैत्र शुद्ध प्रतिपदेला शासनकाठी उभी केली की हळूहळू ज्योतिबा यात्रेचा रंग चढायला लागतो. आज हा रंग वाडी रत्नागिरी वरती तर आहेच. पण शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलवर देखील आलेला आहे. अशातच अनेक माहिती देणाऱ्या लेखांचे प्रसारण होत असते.

Chaitra Pornima : ज्योतिबा डोंगरावर आज गुलालाची उधळण, ज्योतिबा देवांची कट्यार अन् यमाई देवीचा विवाह सोहळा
Guru Pornima 2022: ...गुरुर भी वो ही! संजय राऊतांनी ट्वीट केला फोटो

पूर्वी अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या संदर्भ अभ्यासण्यात झालेल्या चुकांमुळे तसेच प्रत्यक्ष निरीक्षणाच्या अभावामुळे एक प्रघात पडून गेलेला आहे आणि तो म्हणजे चैत्र यात्रेचा सोहळा हा यमाई आणि ज्योतिबा यांच्या विवाहाचा सोहळा आहे. पण खरे तर हा सोहळा यमाई स्वरूपी रेणुका व जमदग्नी रुपी देवाची कट्यार यांचा असतो.

वास्तविक केदार विजयाच्या 27व्या अध्यायात याविषयीची शंका माता लोपामुद्रेने महर्षी अगस्ती यांना विचारली आहे. ती म्हणते महर्षी आपण यापूर्वी वर्णन करताना नाथ केदार ब्रह्मचारी असल्याचे सांगितले आहे. मग हे विवाह कर्म कसे,

Chaitra Pornima : ज्योतिबा डोंगरावर आज गुलालाची उधळण, ज्योतिबा देवांची कट्यार अन् यमाई देवीचा विवाह सोहळा
Jyotiba Yatra 2023 : जोतिबा डोंगरावर यात्रेची जय्यत तयारी, कधी आहे यात्रा? यंदा उच्चांकी गर्दीची शक्यता

तेव्हा तिला स्पष्टीकरण देताना महर्षी अगस्ती सांगतात, हे भार्ये केदारलिंग हे त्रिगुणावतारी असून त्यांच्या हातातील शस्त्रामध्ये महर्षी जमदग्नींचा क्रोध विराजमान आहे. ज्यावेळेस नाथ यमाईला भेटायला आले. तेव्हा पूर्वी माहूरगडावर सती जाते वेळेला झालेल्या संवादाची आठवण करून तिने पुन्हा एकदा महर्षी जमदग्नीच्या भेटीचे स्मरण केले.

Chaitra Pornima : ज्योतिबा डोंगरावर आज गुलालाची उधळण, ज्योतिबा देवांची कट्यार अन् यमाई देवीचा विवाह सोहळा
Jyotiba Dongar : दख्खनचा राजा जोतिबा देवाचा आज जागर; सोहळ्याला दीड लाखांवर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता

तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी नाथांनी स्वतःच्या शस्त्रातून जमदग्नींना वेगळे करून त्यांना रेणुकेची अर्थात यमाईची भेट घेण्याची विनंती केली. हा सर्व प्रसंग द्वापार युगामध्ये घटल्याने तीन युगांचा विरह संपवण्यासाठी दोघांचे पुन्हा एकदा शास्त्रोक्त विवाह कर्म करण्यात आले.

यालाच अनुसरून आजही देवाचे शस्त्र अर्थात कट्यार यमाईच्या गाभाऱ्यात नेले जाते तिथे रीतसर अंतरपट धरून मंगल अक्षता टाकल्या जातात आणि यानंतर ज्योतिबाच्या श्रीपूजकांच्या स्त्रिया देवीला सौभाग्यवाण अर्पण करतात.

Chaitra Pornima : ज्योतिबा डोंगरावर आज गुलालाची उधळण, ज्योतिबा देवांची कट्यार अन् यमाई देवीचा विवाह सोहळा
Jyotiba Temple : दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात 80 किलो चांदीचा वापर; गाभाऱ्यासाठी 65 लाख रुपये खर्च

हा विधी लाखोंच्या गर्दीत होत असल्याने फार कमी लोकांना प्रत्यक्ष पाहता येतो आणि यात्रेमध्ये हर एक माणसाला स्पष्टीकरण देता येणे शक्य नसल्याने या विधीची कथा फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा ज्योतिबाचाच होतो असा गैरसमज सर्व दूर पसरला आहे.

अनेक लोकगीतातील ज्योतिबा आणि यमाईचा विवाह याबाबत असलेल्या ओव्या देखील दिलेल्या आहेत. परंतु विषयाचे व वस्तुस्थितीचे अल्पज्ञान असलेल्या लोकांच्या रचनांमुळे संदर्भाच्या झालेल्या अनेक चुका अनेक ठिकाणी पाहता येतात.

त्यामुळे चैत्र यात्रेचा हा आनंद सोहळा नाथ केदार यमाई आणि जमदग्नींच्या भेटीसाठीच घडवतात हे मनामध्ये पक्के रुजले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com