Chanakya Niti: श्रीमंत कसं व्हायचं? जागतिक स्तरावरील या प्रश्नाचं आचार्य चाणक्य यांनीच उत्तर दिलंय!

Chanakya Niti in Marathi: तुमच्यातही हे गुण असतील तर श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकत नाही!
Chanakya Niti for wealth in Marathi
Chanakya Niti for wealth in Marathiesakal

Chanakya Niti for wealth: श्रीमंत होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक अहोरात्र मेहनतही घेतात. मात्र मेहनतीचे फळ मोजक्याच लोकांना मिळते तर काहींना निराशाच मिळते.

कारण मेहनतीबरोबरच पुढे जाण्याच्या रणनीतीवरही काम करणं गरजेचं आहे. आचार्य चाणक्य ऊर्फ विष्णुगुप्त ऊर्फ कौटिल्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती' या नीतिशास्त्रात सांगितले आहे की, मेहनतीबरोबरच आपल्या जीवनशैलीत काही बदल करून माणूस श्रीमंत होऊ शकतो.

आचार्य चाणक्य हे सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेत महामंत्री होते. जुलमी नंद घराण्याची राजवट संपवण्यात चाण्याक्यांचाच हात होता.

सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात चाणक्याचेच योगदान होते.  त्यामुळे तुम्हालाही तुमच्या कामात सम्राट व्हायचं असेल तर त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चाला. 

आचार्य चाणाक्य यांनी तुम्ही तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टी बददल्या पाहीजेत. ज्यामुळे यश तुमच्या पायाशी लोळण घेईल. याबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या तुम्हाला करोडपती बनवतील.(आचार्य चाणक्य)

Chanakya Niti for wealth in Marathi
Rohini Acharya लालूंच्या कन्येचं भाजप नेत्यांकडून कौतुक; सोशल मीडियावर पोस्ट करून म्हणाले....

मेहनत महत्त्वाची

आचार्य चाणक्य म्हणतात की, केवळ श्रीमंत होण्याचा विचार तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही. त्यासाठी मेहनत आणि मेहनतही खूप महत्त्वाची असून मेहनतीच्या जोरावर श्रीमंत होणे समाधान देते. त्यामुळे कधीही मेहनत करायला घाबरू नका. कारण मेहनती माणूस कधीच निराश होत नाही. किंबहुना तो आयुष्यात नक्कीच यश मिळवतो.

शिस्तीचे पालन

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, श्रीमंत होण्यासाठी व्यक्तीने आपल्या जीवनात शिस्त पाळली पाहिजे. शिस्तबद्ध जीवनशैली आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जाते. त्यामुळे प्रत्येक काम वेळेत पूर्ण करावे आणि उद्यासाठी कोणतेही काम सोडू नये. शिस्तप्रिय व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

धाडस

व्यक्तीने आयुष्यात कधीही धोका पत्करण्यास घाबरले नाही पाहिजे. जोखीम किंवा आव्हाने स्वीकारण्यास घाबरणारी व्यक्ती लाख प्रयत्न करूनही यशस्वी होत नाही.

अशा व्यक्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद कधीच मिळत नाही. त्यामुळे यश मिळवण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला आयुष्यात अनेकदा जोखीम पत्करावी लागू शकते आणि त्यांना सामोरे जावे लागू शकते.

Chanakya Niti for wealth in Marathi
Chanakya Niti : 'या' पुरुषांचे लव्ह रिलेशन खूप काळापर्यंत टिकते

फोकस रहा

आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीचे डोळे आपल्या ध्येयावर कावळ्यासारखे असले पाहिजेत. जी व्यक्ती नेहमी काम करत राहते आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असते आणि आपल्या कामातील अडथळ्यांना घाबरत नाही. एक दिवस ती व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. असे लोक नक्कीच श्रीमंत होतात.

सर्वांना सोबत न्या

आचार्य चाणक्य म्हणतात की, जीवनात तीच व्यक्ती श्रीमंत होते. ज्याच्यात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भावना असते. जी व्यक्ती फक्त स्वत:चा, आई लक्ष्मीचा विचार करते ती फार काळ टिकत नाही. त्यामुळे व्यक्तीमध्ये सहकार्याची भावना निर्माण झाली पाहिजे आणि सर्वांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत.

चुकीचं वागू नका

आचार्य चाणक्य यांच्या मते, चुकीची कामे करणारी व्यक्ती कधीच महान व्यक्ती बनू शकत नाही. दुसरीकडे, जे लोक चुकीच्या कामांपासून दूर राहतात ते वादांपासून दूर राहतात.

यामुळे ती व्यक्ती आयुष्यात अधिक यशस्वी होतो. तुम्हीही चुकीच्या कामांपासून दूर राहून काम कराल तर एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

Chanakya Niti for wealth in Marathi
Chanakya Niti : असा स्वभाव असणारे लोक होतात लवकर उद्ध्वस्त; चाणक्य सांगतात...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com