Astro Tips of lucky feets
Astro Tips of lucky feetsEsakal

Foot palmistry: खरचं पायाचे तळवे सपाट असलेले लोक खूप मेहनती असतात का?

सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीराचा आकार पाहून एखाद्या व्यक्तीचे भविष्य तसेच त्याचे गुण आणि स्वभाव जाणून घेता येतो.
Published on

सामुद्रिक शास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या शरीराची रचना पाहून त्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी कळू शकतात. सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीराचा आकार पाहून एखाद्या व्यक्तीचे भविष्य तसेच त्याचे गुण आणि स्वभाव जाणून घेता येतो.

तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की पायाच्या तळव्यांचा आकार आणि तळव्यावरील खुणा व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगतात.काही व्यक्तीच्या तळव्यावर असे चिन्ह असतात जे त्या व्यक्तीच्या भविष्यासाठी शुभ मानले जातात.

चला तर मग जाणून घेऊया पायाच्या रचनेवरून तुमचे भविष्य..

Astro Tips of lucky feets
Health: जेवणानंतर या पाच गोष्टीचे सेवन नका करू, शरीराला पोहचवू शकते हानी.

1) समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांचे तळवे अतिशय मऊ, गुळगुळीत आणि लाल रंगाचे असतात. असे लोक खूप भाग्यवान राहतात. अशा लोकांवर देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते.

2) तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की खूप लोकांच्या पायाचे तळवे सपाट असतात. असे लोक खूप मेहनती असतात आणि त्यांचे विचारही खुले असतात. असे मानले जाते की असे पाय असलेले लोक स्वतःहुन इतरांना मदत करतात.

3) ज्या लोकांच्या पायाच्या टाचांची त्वचा कोरडी असते आणि पायाला भेगा असतात. अशा लोकांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो.

4) अनेक लोकांच्या पायाच्या तळव्याचा रंग पूर्णपणे पांढरा असतो. असे मानले जाते की अशा रंगाच्या लोकांमध्ये योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता नसते. असे लोक कोणतेही काम करण्यापूर्वी जास्त विचार करत नाहीत.त्यामुळे ते स्वतःचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून घेतात.

5) ज्या लोकांच्या पायाचे तळवे काळे असतता,अशा लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच भविष्यातही या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

6) जर एखाद्या व्यक्तीच्या तळव्याच्या टाचेपासून रेषा सुरू होऊन अंगठ्याच्या मध्यभागी पोहोचली तर असे लोक खूप भाग्यवान असतात. अशा लोकांना पैशाची कमतरता नसते. तसेच, असे लोक त्यांचे जीवन अतिशय आरामात जगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com