Bad Habits: या सवयींमुळे तुमची Health होईल खराब, त्वरित बदला या वाईट सवयी

दिवसभरामध्ये आपण अनेक काम करत असतो. ही काम करत असताना आपल्या हातून नकळत काही अशा गोष्टी घडत असतात ज्या आरोग्यासाठी Health हानिकारक ठरू शकतात
Bad Health Habits
Bad Health HabitsEsakl

Bad Health Habits: निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार Diet घेणं तसचं स्वच्छता बाळगळं गरजेचं आहे. अनेकजण योग्य आहार घेण्याकडे लक्ष देतात. रोजची दिनचर्या चांगली होण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र नकळत आपल्यापैकी अनेकजण अशा काही छोट्या मोठ्या चुका करत असतात. Change Bad Habits which will affect your Health Marathi Tips

त्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. अनेकदा चांगला आहार किंवा जीवनशैली Life Style आत्मसात करूनही आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी सतत उद्भवत असतात. यासाठी या काही चुकीच्या सवयीच Bad Habits जबाबदार असतात.


दिवसभरामध्ये आपण अनेक काम करत असतो. ही काम करत असताना आपल्या हातून नकळत काही अशा गोष्टी घडत असतात ज्या आरोग्यासाठी Health हानिकारक ठरू शकतात.

मुख्य म्हणजे या गोष्टी करत असताना त्या धोकादायक ठरू शकतात याची आपल्याला जराही कल्पना नसते. उदाहरण द्यायचं झाल्यास जेवल्यानंतर Meal लगेच ब्रश करणं, टाइट कपडे परिधान करणं अशा काही सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमुळे आरोग्यावर परिणाम होत असतो. यामुळे काही वेळस एखाद्या गंभीर आजाराचा सामनादेखील करावा लागू शकतो.

ज्या गोष्टींकडे आपण गांभिर्याने पाहत नाही. मात्र त्यामुळे आपल्या शरीरावर आतून विपरीत परिणाम होत असतो अशा सवयी वेळच बदलणं गरजेचं आहे. या सवयी कोणत्या ते पाहुयात

हे देखिल वाचा-

Bad Health Habits
Bad Habits For Brain  : तुम्ही स्वत:च करत आहात तुमचा मेंदू बाद? कसं ते वाचा! 

जेवल्यानंतर लगेचच ब्रश करणं- जेवल्यानंतर खास करून रात्रीच्या जेवणानंतर ब्रश करणं ही नक्कीच एक चांगली सवय आहे. यामुळे दात आणि हिरड्यां चांगल्या राहण्यास मदत होते.

मात्र जेवणानंतर लगेचच दात घासणं चुकीचं आहे. कोलंबिया यूनिवर्सिटीच्या एका संशोधनानुसार आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच ब्रश करणं हानिकारक ठरू शकतं. यामुळे दातांचं इनॅमन डॅमेज होण्याची शक्यता असते.

यासाठीच जेवल्यानंतर किमान अर्धा तासांनंतर ब्रश करावं. तसचं जेवणानंतर अर्धा तासाने पाणी प्यावं.

नळाच्या पाण्याने तोंड धुणं- जवळपास सगळेचजण तोंड धुण्यासाठी थेट नळाच्या पाण्याचा वापर करतात. मात्र नळाच्या पाण्याचा वापर तोंड धुण्यासाठी करण्यापूर्वी त्याची pH लेव्हल माहिती असणं गरजेचं आहे. या पाण्याचा पीएच जवळपास ४.७ असणं गरजेचं आहे.

जर तोंड धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्याचा pH ५ हून जास्त असेल तर त्वचेच नुकसान होवू शकतं. खास करून तुम्ही जेव्हा घराबाहेर एखाद्या नव्या ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये राहत असाल तर काळजी घेणं गरजेचं आहे.

कारण बऱ्यादचा बोअर वेलचं पाणी इथं पुरवलं जातं. या पाण्याने तोंड धुतल्यास त्वचा ड्राय होण्याची शक्यता असते.

हे देखिल वाचा-

Bad Health Habits
Tea Drinking Habit : चहा प्यायल्याने खरंच काळे होतो का?

जुने बटाटे खाणं- अनेक दिवस साचवून ठेवलेले बटाटे खाणं देखील आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. वेबएमडीच्या रिपोर्टनुसार बटाट्यामध्ये सोलनिन सारखे काही विषारी तत्व असतात. ही तत्व वाढल्यानेच बटाटे आतून काहीवेळेस हिरवे होतात.

आतून हिरवे झालेले हे बटाटे खाल्ल्याने पोटदुखी, उलटी तसचं ताप येणं अशा काही समस्या निर्माण होवू शकतात. यासाठीच बटाटे एकदाच घेऊन ते साठवून ठेवू नका. तसचं आतून हिरवट दिसणारा बटाटा स्वयंपाकासाठी वापरणं टाळा.

टाइट कपडे परिधान करणं- तुम्ही फॅशनसाठी जरी टाइट कपडे घालत असलात तरी त्याचे तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होवू शकतात.

टाइट कपड्यांमुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डरचा धोका वाढतो. तसंच पोट आणि आतड्यांवर दबाव निर्माण झाल्याने पचनसंस्था मंद गतीने कार्य करते. तसचं यीस्ट इंफेक्शन आणि नसांमध्ये वेदना निर्माण होवू शकतात.

पुरुषांनी टाइट जीन्स किंना पॅन्ट परिधान केल्याने त्यांचा परिणाम उष्णता वाढल्याने शुक्राणूंची कमतरता निर्माण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com