Chicken Kabab : घरीच बनवू शकता चिकन खिमा कबाब, फक्त रेसिपी आणि टिप्स लक्षात ठेवा

मटण सुक्क्याच्या जोडीला ताटात चिकन कबाबही आले, तर जेवायला अधिकच मजा येते
Chicken Kabab recipe in marathi
Chicken Kabab recipe in marathiesakal

Chicken Kabab :

पाहुण्यांकडे जेवणासाठी गेल्यानंतर भाकरी,रस्सा, मटण सुक्क्याच्या जोडीला ताटात चिकन कबाबही आले, तर जेवायला अधिकच मजा येते. कारण, रेग्युलर सुक्क अन् रस्सा सगळेच करतात. पण, चिकन लॉलिपॉप, कबाब हे पदार्थ जेवणाची चव अधिक वाढवतात.

आजकाल लग्नाच्या पंगतीला ताटासोबत बटाटा पॅटीस, पनीर कबाब असतात. तसेच, मासांहारी ताटाला चिकनचे कबाब असले तर जेवणाला तृप्त होतो. जेवणाचं कौतुकही होतं अन् घरी आलेला पाहुणा खूश होऊन परततो. (Chicken Recipe)

Chicken Kabab recipe in marathi
Onion Paratha Recipe : नाश्त्यात बनवा टेस्टी ओनियन पराठा, ही सोपी रेसिपी नोट करा..

रोजच्या मेन्यू पेक्षा वेगळी रेसिपी शोधत असाल. तर चिकन खिमा कबाब तुमचीच वाट पाहत आहेत. चिकन खिम्यापासून कुरकुरीत टेस्टी कबाब कसे बनवायचे हे पाहुयात.

साहीत्य -

२५० ग्रॅम चिकन खिमा, पाव वाटी कोथिंबीर, पातीचा कांदा पातीसह बारीक चिरून अर्धी वाटी, २ टे. स्पून आलं-लसूण पेस्ट, १ टी स्पून गरम मसाला, १ टी स्पून तिखट, पाव चमचा हळद, २ ब्रेड स्लाइस कडा काढून, दोन अंडी, तेल, मीठ, ब्रेडक्रम्स्,

Chicken Kabab recipe in marathi
Veg Cutlets Recipe : नाश्त्याला बनवा चविष्ट व्हेज कटलेट्स, एकदम सोपी आहे रेसिपी

कृती :

  • चिकन खिमा बारीक चाळणीत स्वच्छ धुवून हाताने दाबून पाणी काढून टाकावे.

  • त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पातीचा कांदा, हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट गरम मसाला, मीठ, ब्रेड स्लाइस पाण्यातून काढून घट्ट पिळून टाकून सर्व चांगले मिक्स करावे.

  • मिक्स झाले की त्याचे तळहातावर पाण्याचा हात घेऊन छोटे कबाब तयार करावेत.

  • अंडी फेटून घ्यावीत प्रत्येक कबाब अंड्यात बुडवून ब्रेडक्रम्स्मध्ये घोळवून फ्राईंगपॅनमध्ये जास्त तेलात शॅलोफ्राय करावेत किंवा कढईत तेल घालून गुलाबी रंगावर मंद तळावेत.

Chicken Kabab recipe in marathi
Solkadhi Recipe : कडक उन्हाळ्यात गारेगार व्हायला सोलकढी हवीच,जाणून घ्या सोपी रेसिपी

महत्त्वाची टिप

चिकन खिमा लवकर शिजतो पण कच्चा वापरला असल्याने तेलात मंद आचेवर तळावेत म्हणजे खिमा शिजून येईल. ह्याच मसाल्याच्या मोठाले कबाब करून बर्गर बन मधे घालून कांदा, टोमॅटो वगैरे घालून बर्गर तयार करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com