Child Care: मुलांना थकवा जाणवतोय? आहारात करा या पदार्थांचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child Care
पालकांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांच्या मुलाला आरोग्य किंवा इतर समस्यांना सामोरे जावे लागते.

Child Care: मुलांना थकवा जाणवतोय? आहारात करा या पदार्थांचा समावेश

Child Care Tips: आपल्या मुलाला निरोगी ठेवण्यासाठी त्याचे आई-बाबा कायम झटत असतात. त्यासाठी ते विविध आरोग्यदायी पदार्थ आणि फळांचा आहारात समावेश करतात. मुल निरोगी (Healthy) असण्यासोबतच ते सक्रिय व्हावे, हा पालकांचा (Parents) प्रयत्न असतो. परंतु पालकांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांच्या मुलाला आरोग्य (Health) किंवा इतर समस्यांना सामोरे जावे लागते. या त्रासांपैकी एक म्हणजे त्यांचे मूल सतत थकलेले असते. तज्ज्ञांच्या मते, जर मूल सक्रिय नसेल आणि त्याला नेहमी थकवा जाणवत असेल, तर त्यामागे शरीरात पोषक तत्वांची कमतरता असू शकते. आम्ही येथे व्हिटॅमिनच्या (Vitamin) कमतरतेबद्दल बोलत आहोत. आम्ही तुम्हाला अशाच काही व्हिटॅमिनयुक्त पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही तुमच्या मुलाच्या आहारात (Diet) समावेश केलाच पाहिजे. या पदार्थांचे सेवन केल्याने, मूल केवळ सक्रियच राहणार नाही, तर तो निरोगी देखील राहू शकेल. (Child care: The child feels tired, include these healthy foods in the diet diet)

हेही वाचा: के.एल.राहुलने अथियाला म्हटलं 'Mad Child'!

व्हिटॅमिन बी 6 असलेले पदार्थ (Vitamin B6)-

पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन बी 6 महत्वाची भूमिका बजावते. या पेशी आपल्या शरीरातील कोणत्याही प्रकारच्या समस्यांशी लढण्यासाठी मदत करतात. या पेशींना टी-सेल्स देखील म्हणतात. केळी, हरभरा, मासे आणि सीफूडमध्ये व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. व्हिटॅमिन B6 मुलांची प्रतिकारशक्ती वाढवून अॅक्टीव्ह राहण्यास मदत करू शकते. या पदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करायला हवा.

व्हिटॅमिन सी (Vitamin C)-

व्हिटॅमिन सी केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही खूप महत्त्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन-सी हा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे संयोजी ऊतींमध्ये सुधारणा होते आणि सांध्यांना आधार देण्याचे कार्य करते. याशिवाय व्हिटॅमिन सी न्युट्रोफिल्स अर्थात पांढऱ्या रक्त पेशींना मदत करते जे संक्रमणाशी लढतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. त्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, तुम्ही संत्री, लिंबू आणि दही यांचे सेवन मुलाला करू शकता.

हेही वाचा: Parenting Tips | मुलांचा हट्ट पुरवा, पण...

व्हिटॅमिन ई (Vitamin E)-

व्हिटॅमिन ई मध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. जर आपण आपल्या आहारात व्हिटॅमिन ईचा समावेश केला तर आपण अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून दूर राहू शकतो. तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना होतात आणि अशक्तपणाही येतो. मुलामध्ये व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही अॅव्होकॅडो, पेपरिका आणि बदामासारखे पदार्थ आहारात समाविष्ट करू शकता.

व्हिटॅमिन डी (Vitamin D)-

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेकदा मुले थकतात. बहुतेक पालकांना हे कारण कळत नाही आणि ते औषधांवर पैसे खर्च करू लागतात. आहार आणि सूर्यप्रकाशाद्वारे मुलामध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करता येते. तुम्ही तुमच्या मुलाला दूध, अंडी किंवा सोया दूध वापरायला लावू शकता. तसेच त्याला दिवसातून एकदा 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसण्यास सांगा.