Study Room: मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढवायचीय? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

Wall Art: तुमच्या मुलांची अभ्यासात गोडी वाढवायची असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.
Wall Art
Wall Art Sakal

child care tips best wall arts for study room

मुलांची अभ्यासात गोडी निर्माण होण्यासाठी पालक अनेक उपाय करत असतात. मुलांना अभ्यासाठी टेबल आणि खुर्ची देतात. पण तरीसुद्धा अभ्यासात गोडी निर्माण होत नसेल तर अभ्यासासंबंधित वस्तु ठेवाव्या. यामध्ये ग्लोब, टेबल लॅम्प, पेन स्टँड आणि बुक शेल्फ या आवश्यक गोष्टी आहेत. पण याशिवाय भिंतींवर अभ्यासासंबंधित वॉल स्टीकर लावू शकता.

  • जगाचा नकाशा

मुलांच्या स्टडी रूममध्ये जागतिक नकाशाची वॉल स्टीकर लावू शकता. भूगोलाचा अभ्यास करतांना मुलांना या स्टीकरची मदत घेता येईल. यामुळे कोणता देश कुठे आहे हे मुलांच्या लक्षात राहील.

  • सक्सेस वॉल स्टिकर

स्टडी रूममध्ये अभ्यासाशी संबंधित स्टिकर लावणे मुलांसाठी फायदेशीर ठरते. मुलांच्या स्टडी टेबलजवळ सक्सेस कोटचे स्टीकर लावू शकता. सारखे सक्सेस कोटवर लक्ष जात असल्याने मुलांना अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते.

Wall Art
Side Effects Of Sitting Long Time: जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून काम केल्यास होऊ शकतात 'हे' आजार
  • गणिताचे सुत्र

अभ्यास हा फक्त पुस्तक वाचून होत नाही तर कधी कधी बधूनही अभ्यास होतो. स्टडी रूममध्ये अभ्यासासंबंधित वस्तू ठवणे मुलांसाठी फायदेशीर असते. मुलांसाठी गणिताचे सुत्र असलेले वॉल स्टिकर लावू शकता. यामुळे रूममध्ये येता -जाता पाहून गणिताची सुत्र लक्षात ठेवता येतील. मुलांना पुस्तक किंवा नोट्स काढण्याची गरज पडणार नाही.

  • स्वच्छता

मुलांची स्टडी रूम नेहमी स्वच्छ ठेवावी. यामुळे रूममध्ये सकारात्मक वातावरण राहते. तसेच अभ्यासात देखील लक्ष केद्रित होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com