Child Care Tips : मुलांसाठी सगळं करता ना मग प्रेम करायला कसं विसरलात?; या पद्धतीने मुलांसोबत बनवा बॉन्डींग!

रोज मुलांना विचारा हा प्रश्न, नक्की बदलेल तुमचं नातं
Child Care Tips
Child Care Tipsesakal

Child Care Tips : एखादं कपल जेव्हा आई वडील होतात. तेव्हा जन्मलेल्या बाळाला पहिल्यांदा हातात घेऊनच ते अनेक स्वप्न रंगवतात. मुलांसाठी खेळणी, कपडे, गरजेच्या, महागड्या वस्तू असं सगळं आणतात. त्यासाठी ते अधिक मेहनत घेतात आणि कष्ट करून पैसा कमावतात.

सर्व पालक आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. अनेकदा पालक मुलांशी अतिशय काटेकोरपणे वागतात. ज्यामुळे मुलांना पालकांच्या प्रेमावर संशय येऊ लागतो. अशावेळी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काही खास पद्धतीने मुलांसमोर प्रेम व्यक्त करू शकता. यामुळे मुलांचा तुमच्या प्रेमावर विश्वास तर बसेलच.

शिवाय मुलांशी तुमचे नातेही घट्ट होईल. तर चला तर मग आम्ही तुम्हाला पालकत्वाच्या काही सोप्या टिप्स सांगतो. ज्या फॉलो करून तुम्ही मुलांना त्यांच्या प्रेमाची अनुभूती देऊ शकता.

Child Care Tips
Parenting Tips :  एका मुलीच्या आईला चुकूनही अशा गोष्टी बोलू नका; नाहीतर...

हे असू शकते कारण

अनेकदा बिझी शेड्युलमुळे पालकांना मुलांसाठी वेळ काढता येत नाही. अशा तऱ्हेने मुलेही आपल्या पालकांपासून दूर राहू लागतात. त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांचे आपल्यावर प्रेम नाही, असे मुलांना वाटते. अशा वेळी मुलांसमोर प्रेम व्यक्त करणे आणि त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगणे आवश्यक ठरते.

आरोग्याची काळजी घ्या

मुलांना प्रेम दाखवण्यासाठी दिवसातून एकदा विचारा. तु ठिक आहेस ना, असा प्रश्न विचारून तुम्ही मुलांच्या दिवसभरातील अॅक्टिव्हिटीज जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर मुलंही तुमच्या जवळ येऊ लागतात आणि मुलांशी तुमचं नातं घट्ट होतं.

Child Care Tips
Parenting Tips : मुलांनी मोबाईल सोडावा म्हणून तुम्ही मेहनत घेणं गरजेचं? ; पण नेमकं काय करायचं
मुलांना घडवणं सोप्प नक्कीच नसतं
मुलांना घडवणं सोप्प नक्कीच नसतंesakal

प्रेम व्यक्त करा

अर्थातच तुम्ही तुमच्या मुलावर खूप प्रेम करता. पण मुलासमोर प्रेम व्यक्त करून तुम्ही त्याला बरं वाटू शकता. त्यासाठी दिवसातून एकदा मुलाला आय लव्ह यू म्हणा. तुमचे हे तीन शब्द मुलासोबतचे तुमचे नाते दृढ आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी उपयुक्त ठरतील.

चूक मान्य करा

अनेकदा पालकही मुलांबाबत गैरसमज करण्याची चूक करतात. अशावेळी आपला अहंकार बाजूला ठेवा आणि मुलांना लगेच सॉरी म्हणा. तुम्ही मुलांचा आदर करत असाल तर त्या बदल्यात मुलंही तुम्हाला पूर्ण सन्मान देण्याचा प्रयत्न करतील.

Child Care Tips
Parenting Tips : मुलांच्या ओठांवर चुंबन घेणे योग्य की अयोग्य?

मुलांसाठी वेळ काढा

नोकरी करणारे पालक अनेकदा व्यस्त वेळापत्रकामुळे मुलांच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेत वेळ काढून मुलांना विचारा की त्यांनी जेवण खाल्ले आहे की नाही. यामुळे आपण त्यांची खूप काळजी घेतो हे मुलांना कळेल आणि ते आपल्याशी आणखी जोडले जाऊ लागतील.

मुलांसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांना स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देऊ शकता. यामुळे मुलांना तुमच्या काळजी घेण्याच्या वर्तनाची कल्पना येईल आणि मुले तुमच्या जवळची वाटू लागतील.

Child Care Tips
Parenting Tips : मुलं तुमचं ऐकत नाहीत? या आहेत हट्टी मुलांना हाताळणाच्या सोप्या ट्रिक्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com