Children’s Day 2021 : ...म्हणून 14 नोव्हेंबरला साजरा करतात बालदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children’s Day

Children’s Day 2021: दरवर्षी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करतात. लहान मुलांचे शिक्षण, हक्क याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांची योग्य काळजी घेण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

Children’s Day 2021 : ...म्हणून 14 नोव्हेंबरला साजरा करतात बालदिन

sakal_logo
By
शरयू काकडे

Children’s Day 2021: उद्याच्या उज्वल भविष्याचा मुलं ही भक्कम पाया आहे. दरवर्षी भारतामध्ये 14 नोव्हेंबरला बालदिन (Children’s Day) साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू(India's first Prime Minister Jawaharlal Nehru) ज्यांना चाचा नेहरू (Chacha Nehru) यांच्या निधनानंतर हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्यासाठी निवडण्यात आला. 14 नोव्हेंबरला जवाहरल लाल नेहरु(Jawaharlal Nehru birth anniversary) यांचा वाढदिवस साजरा केला जातो. मुलांचे हक्क आणि त्यांना सर्व प्रकाराचे ज्ञान प्राप्त होईल आणि सहज उपलब्ध होईल अशी शिक्षण प्रणाली निर्माण करण्याचे नेहरू हे पुरस्कर्ते होते. (Children’s Day 2021 History Significance and all that you need to know)

Children’s Day

Children’s Day

हेही वाचा: 14 नोव्हेंबरला का साजरा करतात World Diabetes Day?

बालदिन इतिहास आणि महत्त्व (Children’s Day History and Significance)

सुरुवातीस भारतातमध्ये बालदिन 20 नोव्हेंबरला केला जात होता, ज्या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे जागतिक बालदिन साजरा केला जातो. मात्र, जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा ठराव भारतीय संसदेत मंजूर करण्यात आला. जवाहरलाल नेहरू यांचे 1964 साली निधन झाले आणि तेव्हापासून त्यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो.

हेही वाचा: नेहरू म्हणायचे मुले देशाचे भावी आधारस्तंभ

Children’s Day

Children’s Day

नेहरूंच्या जयंती व्यतिरिक्त, बालदिन मुलांचे शिक्षण, हक्क याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि सर्वांना योग्य काळजी उपलब्ध होत आहे का हे पाहण्यासाठी साजरा केला जातो. "आजची मुलं उद्याचा भारत घडवतील," जवाहरलाल नेहरू एकदा म्हणाले होते.

देशभरात बालदिन उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मुलांना खूप भेटवस्तू देऊन, प्रेम व्यक्त करुन त्यांचे लाड पुरविले जातात. शाळांमध्येही बालदिन उत्साहात साजरा करतात. शिक्षक मुलांसाठी मनोरंजक कार्यक्रम ठेवतात आणि त्यांना काहीतरी भेटवस्तू देखील देतात ज्यामध्ये खाण्या पिण्याच्या वस्तू, पुस्तक असतात. गेल्यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे बालदिनाचे उत्सव ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे साजरे केले जातात. पण आता पूर्वीप्रमाणे मुले शाळेत जाऊ लागल्याने यंदा आणखीन उत्साहात बालदिन साजरा केला जात आहे.

loading image
go to top