
नेहरू म्हणायचे मुले देशाचे भावी आधारस्तंभ
-सीमा सावंत
उंड्री : पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीनिमित्त दरवर्षी बालदिन साजरा केला जातो. त्यांना लहान मुले खूप आवडत असत. मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, असे पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा सावंत यांनी सांगितले.
पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिसोळी (ता. हवेली) प्राथमिक विद्यालयामध्ये सावंत यांनी मुलांना अभिव्यक्त होण्याकरिता बालदिनानिमित्त रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवीतील ६८ मुलांनी सहभाग घेतला होता.
पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका पासलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका निर्मला पासलकर, शिक्षक देवराम भोसले, माधवी जगताप, मेनका सुपेकर, राजू काळे, संगीता मोहिते, किरण काळे, योगिता ओव्हाळ, योगिता वाडेकर, जयश्री जाधव, हवेली तालुका काँग्रेस अध्यक्षा मंदाकिनी नलवडे, खडकवासला मतदारसंघ अध्यक्षा वैशाली खाटपे, अनुसूचित जाती महिला काँग्रेस अध्यक्षा रिबेका कांबळे, सीमा सावंत आदी उपस्थित होते. सीमा सावंत यांनी चित्रकलेचे साहित्य आणि रांगोली उपलब्ध करून दिली.
मुख्याध्यापिका पासलकर म्हणाल्या, कोरोनामुळे मागिल वर्षी शाळा बंद होत्या. आता शाळा सुरू झाल्यामुळे पालक आणि मुलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत अभ्यास घेतला जात आहे, असे त्यांनी सांगितले.