या देशात माणसांप्रमाणेच चक्क कुत्र्यांची काढली जाते मिरवणूक; काय आहे या अनोख्या उत्सवाची परंपरा? जाणून घ्या

WHY DOGS ARE CARRIED IN PALANQUINS IN CHINA: चीनमध्ये कुत्र्याला पारंपरिक कपडे आणि दागिने घालून पालखीतून मिरवतात. काय आहे मियाओ समुदायाच्या अनोख्या डॉग कॅरिंग फेस्टिव्हलमागची परंपरा?
Dog Carrying Festival China | Tai Gou Ji

Dog Carrying Festival China | Tai Gou Ji

sakal

Updated on: 

CHINA DOG CARRYING FESTIVAL TRADITION AND HISTORY: जगात वेगवेगळ्या भागात वर्षानुवर्ष बऱ्याच वेगळ्या, अपिरिचित आणि खास परंपरा जपल्या जातात. काही ठिकाणी गावातल्या एका लहान मुलीली देवीचं रुप मानलं जातं, तर काही ठिकाणी दफन केलेलं पूर्वजांचं प्रेत पुन्हा खोदून बाहेर काढलं जातं. पण, या काही परंपरा ऐकायला जितक्या वेगळ्या वाटतात, तितक्याच त्यामागच्या कथा रंजक असतात.

चीनमध्ये सुद्धा असाच एक उत्सव साजरा केला जातो. ज्यामध्ये कुत्र्याला पारंपरिक पोशाख घालून, दागिन्यांनी सजवलं जातं आणि चक्क पालखीत बसवून गावातून त्याची मिरवणूक काढली जाते. कुत्र्याला एवढा मान का दिला जातो आणि या उत्सवाची सुरुवात कशी झाली, यामागे दोन रंजक कथा सांगितल्या जातात.

Loading content, please wait...