आरोग्यदायी तेल निवडताना...

वर्षानुवर्षे आपल्याला असे सांगितले जात आहे
तेल
तेल sakal

डॉ. रोहिणी पाटील

वर्षानुवर्षे आपल्याला असे सांगितले जात आहे, की चरबी खाल्ल्याने कंबरेवरील चरबी वाढते, कोलेस्टरॉल वाढते आणि आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होतात. मात्र, ते संपूर्ण सत्य नाही. चरबीचे २ प्रकार आहेत - चांगली चरबी आणि वाईट चरबी. चांगल्या चरबीमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड समाविष्ट असतात जे तुमच्या मेंदू, हृदयासाठी आवश्यक असतात आणि व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के सारख्या विशिष्ट जीवनसत्त्वे शरीरात शोषण्यास मदत करतात, तर वाईट चरबीमध्ये ट्रान्स फॅट्सचा समावेश असतो.

स्मोकिंग पॉइंट तपासा

तेल जास्त वेळ गरम केल्यास त्यातून धूर येण्यास सुरवात होते. ज्या तापमानाला तेल धूर निर्माण करायला सुरवात करते त्या तापमानाला त्या तेलाचा ‘स्मोकिंग पॉइंट’ म्हणतात. स्मोकिंग पॉइंटनुसार तेल दोन प्रकारांमध्ये विभागले जाते:

१) उच्च स्मोकिंग पॉइंट असलेले ः ह्या प्रकारचे तेल फक्त तळण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी वापरावे.

उदाहरणार्थ : घाण्याचे तेल, जसे की तूप, खोबरेल तेल, मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल

२) लोअर स्मोकिंग पॉइंट असलेले तेल : अशा तेलांचा वापर सॅलड ड्रेसिंगसाठी करावा.

उदाहरणार्थ : ऑलिव्ह ऑइल, कॅनोला तेल, तिळाचे तेल

तेलांचे मिश्रण समाविष्ट करा

तेल आपल्याला आवश्यक फॅटी ॲसिड प्रदान करते, जसे की ‘ओमेगा ६’ आणि ‘ओमेगा ३’ जे मानवी शरीरात निर्माण केले जाऊ शकत नाहीत आणि केवळ योग्य संतुलित आहारातूनच मिळवावे लागतात. बाजारात अनेक प्रकार उपलब्ध असताना, एकाच प्रकारचे स्वयंपाकाचे तेल वापरल्याने ‘ओमेगा ३’ आणि ‘ओमेगा ६’ फॅटी अॅसिडचे योग्य संतुलन मिळत नाही. म्हणून, मिश्रित तेल जे दोन किंवा अधिक प्रकारच्या तेलांच्या मिश्रणासह येतात ते सर्व आवश्यक फॅटी ॲसिड प्रदान करतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओमेगा ६ आणि ओमेगा ३ चे प्रमाण ५-१०:१ असावे. मिश्रित तेलांच्या उदाहरणामध्ये सूर्यफूल तेल किंवा राइस ब्रॅन ऑइलसह खोबरेल तेल यांचा समावेश होतो. कॅनोला तेल आणि ऑलिव्ह ऑइलचे मिश्रण ८:२ च्या प्रमाणात २० टक्के पाम ऑइलसह तळण्यासाठी योग्य आहे.

तेल बदलत राहा : तुमच्या आहाराद्वारे चांगले फॅट सहज मिळवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे दर ३ महिन्यांनी तेल बदलणे. ‘एनआयएन’च्या शास्त्रज्ञांनी खाद्यतेलांचे दोन गट शोधून काढले आहेत ज्यांना दैनंदिन वापरात बदलत राहण्याची गरज आहे.

गट १ : या गटामध्ये मोहरीचे तेल आणि सोयाबीन तेल समाविष्ट आहे जे ओमेगा ३ ने समृद्ध आहे.

गट २ : या गटात सूर्यफूल तेल, करडईचे तेल, तांदळाच्या कोंड्याचे तेल आणि पाम तेल यांचा समावेश होतो जे ओमेगा ६ने समृद्ध आहे. या गटांनुसार दर ३ महिन्यांनी तेल बदलल्याने तुम्हाला ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी ॲसिडस् तुमच्या दैनंदिन आहाराद्वारे प्रभावीपणे समाविष्ट करण्यास मदत होते.

‘ओमेगा ३’ आणि ‘ओमेगा ६’चे फायदे

निरोगी त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी लाभदायी

संधिवात दरम्यान वेदनेवर प्रभावी

हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम

अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या न्यूरोलॉजिकल विकारांवर प्रभावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com