

सांताक्लॉजचे आकर्षण लहान मुलांना खूप असते. ख्रिसमस जवळ आला की मुले खुष असतात. पांढरी दाढी, पांढरे केस आणि लाल रंगाचे कपडे,टोपी घालून सांता (Santa Claus) येतो. येताना गिफ्ट्स आणतो. ही गिफ्ट (Gift) मिळणार म्हणून मुलांना खूप मजा वाटते. पण लहान मुलांना आवडणारा हा सांता कोण होता हे माहितेय का?
तिसऱ्या शतकात उत्तर ध्रुवावर स्थित मायरा येथील एका श्रीमंत कुटुंबात संत निकोलस यांचा जन्म झाला होता. या संत निकोलस यांनाच खरा सांता म्हणतात. ते अनाथ होते. पुढे, येशूवर त्याचा विश्वास वाढत गेला. त्यांनी येशूलाच आपले पालक मानले. पुढे संत निकोलस मोठा झाल्यावर ख्रिस्ती धर्माचा धर्मगुरू झाले. संत निकोलस यांना सुरुवातीपासूनच लोकांना मदत करणे आवडायचे. लहान मुलांना तर ते हटकून मदत करायचे. मुलांना ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू देऊन त्यांना आनंद द्यायचे. परंतु, त्यांना आपली ओळख कोणालाही सांगायची नव्हती, म्हणून कपडे बदलून मध्यरात्री घरातून बाहेर पडायचं आणि लाल झोळीतून सर्व मुलांना ते भेटवस्तू देत.
आधुनिक काळातील सांता 1930 साली अस्तित्वात आला असे म्हणतात. हेडन सँडब्लोम नावाच्या एक कलाकाराने कोका-कोलाच्या जाहिरातीमध्ये सांताक्लॉजची भूमिका केली होती. जवळपास 35 वर्ष तो सांता म्हणून टीव्हीवर झळकला. लाल कपड्यांमध्ये पांढरी दाढी असलेल्या सांताचे हे नवीन रूप मुलांना खूप आवडले. त्यानंतर सांताची क्रेझ वाढत गेली आणि तो लहान मुलांचा आवडता बनला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.