मेरी ख्रिसमसच का म्हणतात? हॅपी का नाही!

२५ डिसेंबरला येणाऱ्या ख्रिसमसची उत्सुकता बच्चेकंपनीला जास्त असते.
Christmas
Christmas esakal
Updated on

वर्षातला शेवटचा महिना म्हणून डिसेंबर महिन्याची ओळख आहे. शिवाय हा महिना ख्रिसमस (Christmas) आणि न्यू इयर सेलिब्रेशनासाठी (New Year) ओळखला जातो. २५ डिसेंबरला येणाऱ्या ख्रिसमसची उत्सुकता बच्चेकंपनीला जास्त असते. त्यात सांताक्लॉजचे (Santa Claus) आकर्षण जास्त असते. या काळात एकमेकांना शुभेच्छा देताना मेरी ख्रिसमस म्हणत शुभेच्छा दिल्या जातात. इतर सण किंवा स्पेशल दिवशी आपण हॅपी... डे म्हणून एकमेकांना शुभेच्छा देतो. पण ख्रिसमसला मात्र आपण मेरी ख्रिसमस म्हणत शुभेच्छा देतो, असे का? मेरी शब्दाचा नेमका अर्थ काय आहे आणि हॅपी शब्द का वापरला जात नाही, ते जाणून घेणे गरजेचे आहे.

Christmas
ख्रिसमसचा केक बनविण्याचं सिक्रेट माहितेय? केक मिक्सिंगविषयी जाणून घ्या

मेरीचा अर्थ काय आहे( What Is The Meaning Of Merry)

मेरीचा (Merry) अर्थ आनंदीआनंद असा होतो. मेरी शब्द जर्मनी आणि जुन्या इंग्लिशवरून तयार झाला आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, मेरी आणि हॅपीचा (Happy) अर्थ एकच आहे. पण फक्त ख्रिसमसमध्ये हॅपीऐवजी मेरी हा शब्द वापरला जातो.

Christmas
अमेरिकेतून ब्रिटनमध्ये मागवले 300 केक; टॉम क्रूजनं पाठवलं प्रायव्हेट जेट

मेरी शब्द का वापरतात? (Why Merry Word Use)

लोकप्रिय साहित्यिक चार्ल्स डिकेंस यांनी मेरी (Merry) हा शब्द प्रचलित केला. त्यांनी 'अ ख्रिसमस कॅरोल' या त्यांच्या पुस्तकात मेरी हा शब्द सर्वाधिक वापरला, त्यानंतर हॅप्पीऐवजी मेरी हा शब्द वापरात आला. त्यापूर्वी लोक हॅपी ख्रिसमस म्हणायचे. इंग्लंडमध्ये आजही अनेक लोक मेरीऐवजी हॅप्पी ख्रिसमस म्हणतात. दोन्ही शब्द योग्य आहेत पण मेरी हा शब्द आता जास्त प्रचलित आहे.

Christmas
नाताळ सजावटीसाठी Christmas Treeला अशा प्रकारे सजवा

मेरी शब्द कुठून आला ? (Where Did Merry Word Come From)

16 व्या शतकात मेरी (Merry) या शब्दाची उत्पत्ती झाली. त्यावेळी इंग्रजी (English) भाषेची नुकतीच सुरूवात झाली होती. नंतर 18व्या आणि 19व्या शतकात ते अधिक प्रचलित झाले. ख्रिसमसला हॅपीपेक्षा मेरी शब्द जास्त वापरला गेला. पण ख्रिसमसशिवाय इतर कोणत्याही सणात मेरी हा शब्द वापरला गेला नाही.

Christmas
Christmas : मुलांना भेटवस्तू देताय? ट्राय करा Best Gift Idea
christmas gifts
christmas giftsesakal

हॅपी कि मेरी ख्रिसमस काय योग्य? (Which Word Is good)

मेरी ख्रिसमस (Merry Christmas) हा शब्द जास्त प्रचलित आहे. अनेक देशांमध्ये हाच शब्द वापरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. पण जर तुम्ही हॅपी ख्रिसमस म्हटले तरी चालण्यासारखे आहे. हॅपी आणि मेरी ख्रिसमसचा अर्थ एकच असतो. पण बहुतेक लोक मेरी हा शब्द वापरत असल्यामुळे हॅप्पी ख्रिसमस म्हणणे अवघड जाते, पण हॅपी हा शब्द अजिबात चुकीचा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com