Christmas Dress Ideas : लहान मुलांना सांताक्लॉजप्रमाणे रेडी करताना 'या' टिप्स करा फॉलो

ख्रिसमसच्या निमित्ताने लहान मुलांना सांताक्लॉजच्या रूपात रेडी केले जाते.
Christmas Dress Ideas
Christmas Dress Ideasesakal

Christmas Dress Ideas : लहान मुलांना नाताळचा सण प्रचंड आवडतो. कारण, या दिवशी त्यांना भरपूर सारे चॉकलेट्स आणि गिफ्ट्स मिळतात. ख्रिसमसनिमित्त शाळांमध्ये देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे, जगभरातील अनेक देशांमध्ये ख्रिसमसची नुसती धामधूम पहायला मिळते.

ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक पालक आपल्या लहान मुलांना सांताक्लॉजच्या रूपात रेडी करतात आणि मग त्याचे फोटोशूट करतात. यातून लहान मुलांनी ही प्रचंड आनंद मिळतो. मात्र, लहान मुलांना सांताक्लॉजच्या रूपात रेडी करताना पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे. कोणत्या आहेत या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

Christmas Dress Ideas
Christmas Outfit Ideas : ख्रिसमस पार्टीला स्टायलीश लूक करायचा आहे? मग, अभिनेत्रींच्या 'या' रेड आऊटफीट्सपासून घ्या प्रेरणा

सांताक्लॉज ड्रेसची खरेदी

जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी सांताक्लॉज ड्रेसची खरेद करणार असाल तर तेव्हा मुलाला तो ड्रेस व्यवस्थित फिटिंगला बसेल याची खात्री करूनच खरेदी करा. त्यासाठी आधी मुलाच्या ड्रेसच्या साईजचा अंदाज घ्या, मगच ड्रेस खरेद करा.

santaclaus dress
santaclaus dress

जर तुम्ही योग्य फिटिंगचा ड्रेस आणला नाही तर मग तो ड्रेस मुलाला विचित्र दिसेल. हे टाळण्यासाठी मुलाला सांताक्लॉजचा ड्रेस खरेदी करताना योग्य काळजी घ्या.

थंडीपासून असा करा बचाव

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी सुरू आहे. त्यामुळे, जर तुम्ही ख्रिसमसला मुलाला सांताक्लॉजचा ड्रेस घालणार असाल तर मुलाला किंवा मुलीला ड्रेसच्या आतून ऊबदार स्वेटर घालायला विसरू नका. जेणेकरून मुलाला थंडी वाजणार नाही.

नकली दाढी लावा

सांताक्लॉजची खास ओळख ही त्याच्या पांढऱ्या रंगाच्या दाढीपासून होते. त्यामुळे, मुलाला किंवा मुलीला सांताक्लॉजच्या रूपात रेडी करताना पांढरी दाढी लावायला विसरू नका. यामुळे, तुमची मुले क्यूट दिसतील यात काही शंका नाही.

ख्रिसमस टोपी

सांताक्लॉजच्या रूपात मुलाला किंवा मुलीला रेडी केल्यानंतर लाल किंवा पांढऱ्या रंगाची सांताक्लॉज टोपी घालायला विसरू नका. यामध्ये मुले फारच गोड दिसतील.

santaclause Cap
santaclause Cap
Christmas Dress Ideas
Christmas 2023 : यंदाच्या ख्रिसमस पार्टीला असा करा मेकअप लूक, दिसाल आकर्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com