Astro Tips : संपत्ती वाढवण्यासाठी दालचिनीच्या 'या' चमत्कारिक युक्त्या येतील कामी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips : संपत्ती वाढवण्यासाठी दालचिनीच्या 'या' चमत्कारिक युक्त्या येतील कामी..

Astro Tips : संपत्ती वाढवण्यासाठी दालचिनीच्या 'या' चमत्कारिक युक्त्या येतील कामी..

आरोग्य आणि स्वयंपाकघरात वापर होणाऱ्या अनेक गोष्टी ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या या वस्तू ज्योतिषीय उपायांसाठीही वापरल्या जातात. यापैकी एक दालचिनी आहे. दालचिनीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. यासोबतच दालचिनीचा उपयोग सुख-समृद्धीसाठी आणि घरात सुख-समृद्धी वाढवण्यासाठी केला जातो, अशी माहिती ज्योतिषशास्त्र देते.

ज्योतिष शास्त्रात दालचिनीसंदर्भात काही युक्त्या सांगण्यात आल्या आहेत. या युक्त्या खूप चमत्कारिक आहेत. दालचिनीचे हे उपाय कोणत्याही महिन्याच्या पहिल्या तिथीला केले तरच ते फायदेशीर ठरतात आणि शुभ परिणाम प्राप्त होतात. चला जाणून घेऊया दालचिनीच्या या युक्त्या कोणत्या आहेत ते..

हेही वाचा: Astro Tips : वैवाहिक जीवनात मंगळसूत्र घालण्याची 'ही' पद्धत ठरू शकते चुकीची

दालचिनी युक्त्या

तुम्हालाही तुमची संपत्ती वाढवायची असेल तर यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. दालचिनी पावडर घ्या आणि त्यावर घड्याळविरोधी अगरबत्ती फिरवा आणि संपत्ती वाढीसाठी कामना करा. यानंतर ही पावडर एका कागदात गुंडाळून ठेवा आणि जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. पर्समध्ये किंवा तिजोरीत तुम्ही ही पावडर ठेवू शकता. उरलेली पावडर देवघरात ठेवली तरी चालेल. दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पुन्हा करत रहा. लवकरच तुमची संपत्ती वाढू लागेल.

व्यवसायात प्रगतीसाठी दालचिन हा उपाय खूप प्रभावी आहे. दालचिनी पावडर हातात घेऊन घराच्या, व्यवसायाच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूस तोंड करून उभे रहा. यानंतर दालचिनी पावडर या व्यवसायाच्या बाजूने फुंकून टाका. ही युक्ती वापरताना व्यवसायात प्रगती होवो, अशी देवाला प्रार्थना करा. हा उपाय करताना लक्षात ठेवा की आपल्या हाताला लागलेली दालचिनी पावडक पाण्याने न स्वच्छ करता हाताने झाडून बाजूला करा.

हेही वाचा: Health : ग्रीन टीमध्ये 'या' दोन गोष्टींचा समावेश करताय ना? वजन कमी करण्यासाठी होईल फायदा

Web Title: Cinnamon Remedies To Use Dalchini Upay To Get Money And Progress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..