Cleaning Hacks : कपडे न धुताच घालवा कपड्यांना घामामुळे आलेली दुर्गंधी; उपाय तुमच्या किचनमध्येच आहे!

घाम आणि दुर्गंधी याचा त्रास अनेकांना होतो, त्यामुळे बऱ्याचदा लाजही वाटत राहते.
Sweat Stain and smell
Sweat Stain and smellSakal

उन्हाळ्यात उन्हात बाहेर न पडताही अंग घामाने भिजत राहतं. कपड्यांमधून घामाचा वास येऊ लागला की त्रास वाढतो. ज्यांना घाम कमी येतो,किंवा घामाचा वास येत नाही, त्यांना खरं ही मोठी समस्या वाटणार नाही. पण ज्या लोकांच्या शरीरात जास्त घाम येतो, ते त्यापासून मुक्त होण्यासाठी सतत नवे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. घामाच्या वासामुळे अनेकदा फजिती होते.

बहुतेक लोक कपड्यांमधून घामाचा वास काढून टाकण्यासाठी ते पाण्याने आणि डिटर्जंटने धुतात. पण आज आम्ही तुम्हाला काही युक्त्या सांगत आहोत, ज्याच्या मदतीने विशेष प्रयत्न न करता काही मिनिटांतच कपड्यांची दुर्गंधी निघून जाईल.

Sweat Stain and smell
Kitchen Hacks : किचन ट्रॉलीचा महाहट्टी चिकटपणा काही मिनिटांत घालवा या उपायांनी!

बेकिंग सोडा

बेकिंग सोडामध्ये स्वच्छता आणि दुर्गंधीनाशक गुणधर्म आहेत. अशा स्थितीत पाण्यात बेकिंग सोडा टाकून त्याची पेस्ट तयार करा. कपडा उलटा करून ज्या भागातून घामाचा वास येत असेल त्या भागावर लावा. आता थोडा वेळ सुकू द्या. यानंतर, ते झाडून काढून टाका. असे केल्याने घामाच्या वासासह त्याचे डाग काही वेळात नाहीसे होतात. (Lifestyle News)

Sweat Stain and smell
How to Clean Glasses : चष्मा स्वच्छ असेल तरच होईल खऱ्या-खोट्याची ओळख; या टिप्सनी करा Specs चकचकीत!

लिंबाचा रस

लिंबाच्या रसाचा वास ताजातवाना करणारा असतो. त्यामुळे कपड्यांवरचा घामाचा वास काढण्यात लिंबू प्रभावी मानलं जातं. अशा परिस्थितीत कपड्यांचा वास न धुता काढण्यासाठी १ चमचे लिंबाचा रस २०० मिली पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत टाका. आता ते हलवून चांगले मिसळा आणि कपड्यांवर शिंपडा. त्यानंतर काही वेळ कपडे हवेत सुकवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com