Kitchen Hacks : किचन ट्रॉलीचा महाहट्टी चिकटपणा काही मिनिटांत घालवा या उपायांनी!

ही ट्रॉली तेलामुळे चिकट होते, तसंच पावसाळ्यात काही वेळा बुरशीही लागते.
Kitchen Trolly Cabinet
Kitchen Trolly CabinetSakal

आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात मॉड्युलर किचन आहेत आणि किचन ट्रॉली हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. आता स्वयंपाकघरातील सर्व सामान ठेवण्यासाठी ट्रॉली नसेल तर स्वयंपाकघर अव्यवस्थित दिसेल.

मॉड्युलर किचन सोयीचं आहे, परंतु एक समस्या आहे की स्वयंपाकघरातील ट्रॉली साफ करणं खूप कठीण आहे. ही ट्रॉली तेलामुळे चिकट होते, तसंच पावसाळ्यात काही वेळा बुरशीही लागले. अनेक लोक तक्रार करतात की त्यांच्या स्वयंपाकघरातील ट्रॉली खूप अस्वच्छ आहे आणि ती गंजत आहे. आज आम्ही अशाच काही पद्धती सांगणार आहोत ज्याद्वारे किचन ट्रॉली काही मिनिटांत साफ करता येते. यामुळे तुमची किचन ट्रॉली नवीनसारखी चमकेल आणि त्यासोबतच बुरशी आणि गंजसारख्या समस्याही संपतील.

Kitchen Trolly Cabinet
Kitchen Tips : 'या' गोष्टी चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका

ट्रॉली ओली राहू नये

स्वयंपाकघरातील ट्रॉली दीर्घकाळ ओली राहू नये. बर्‍याच स्त्रिया भांडी धुतल्यानंतर लगेच ट्रॉलीमध्ये ठेवतात, त्यामुळे गंजण्याची भीती असते. याशिवाय पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे बुरशीही येते. म्हणूनच महिन्यातून एकदा तरी या किचन ट्रॉली स्वच्छ करणे आवश्यक आहे.

कशाने स्वच्छ कराल?

किचन ट्रॉली स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात १ चमचा मीठ, १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा डिशवॉशिंग लिक्विड आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. आता डिश वॉशिंग स्क्रबरने स्वच्छ धुवा. मिठामुळे बुरशी आणि गंज या दोन्ही समस्या दूर होतील. तुम्ही स्क्रबरऐवजी ब्रशही वापरू शकता. आता कोरड्या कपड्याने पुसून टाका, हवे असल्यास पाण्यानेही धुवा, पण त्यानंतर लगेच ते उन्हात वाळवा. लक्षात ठेवा की किचन ट्रॉलीमध्ये पाण्याचा थेंबही नसावा, अन्यथा ते गंजू शकते.

Kitchen Trolly Cabinet
Kitchen Vastu Tips : किचनमधील वास्तूदोषामुळे आयुष्य होईल उध्वस्त;  ही चित्रे लावा मग बघा धान्यांच्या राशीच पडतील घरात!

खोबरेल तेल

जर किचन ट्रॉली पूर्णपणे स्वच्छ असेल तर त्यात चमक आणण्यासाठी कापसात खोबरेल तेल वापरता येते. यासाठी कापसात खोबरेल तेलाचे काही थेंब टाकून ते सर्व ट्रॉलीवर लावा. यामुळे लवकर गंज येणार नाही आणि ट्रॉलीची चमकही वाढेल. खोबरेल तेलाऐवजी तुम्ही मोहरीचे तेलही वापरू शकता. तेल लावल्यानंतर, ट्रॉली काही वेळ बाहेर सोडा आणि 1 तासानंतर बॉक्समध्ये हलवा.

ओली भांडी थेट ट्रॉलीमध्ये ठेवू नका, भांडी पूर्णपणे कोरडी झाल्यावरच ती हलवण्याचा प्रयत्न करा. पावसाळ्यात ओलावा टाळण्यासाठी ट्रॉली नियमितपणे कोरड्या सुती कापडाने स्वच्छ करा. त्यावर गंज लागणार नाही आणि पाण्याचे डागही राहणार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com