Coconut Milk Benefits : नारळाच्या दुधाच्या या मास्कने दूर होतील केसांच्या सगळ्या समस्या

शरीरासाठी नारळाचं दूध खूप गरजेचं
Coconut Milk Benefits
Coconut Milk Benefitsesakal

Coconut Milk Benefits : नारळाच्या दुधाचे फायदे कोणापासून लपून नाही. शरीरासाठी नारळाचं दूध खूप गरजेचं आहे. अगदी लहानपणापासून आपल्याला आपली आजी आई केसांना खोबरेल तेल लावून देयची.

Coconut Milk Benefits
Christmas Donut Recipe : ख्रिसमस सेलिब्रेशन आलं म्हणजे डोनट सुद्धा आलेच.. मग आत्ताच ट्राय करा याची चविष्ट रेसिपी

पण आता कोणालाही तेलकट केस नको असतात त्यामुळे कोणीही केसांना तेल लावत नाही, त्यामुळे केस खराब होतात. खोबरेल तेल आपल्या केसांसाठी जेवढे फायदेशीर आहे, तेवढेच त्याचे दूधही फायदेशीर आहे.

Coconut Milk Benefits
Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणाऱ्या बाजरी मेथी पुऱ्या कशा तयार करायच्या?

नारळाच्या दुधात हे पोषक घटक असतात

व्हिटॅमिन C, E, B1, B3, B5 आणि B6 सोबत, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि सोडियम देखील नारळाच्या दुधात आढळतात. केसांसाठी नारळाच्या दुधाचा मास्क तुम्ही वापरू शकतात. बर्याच काळापासून, लोक केसांना कंडीशन करण्यासाठी नारळाचे दूध वापरता आहेत. त्यात जास्त प्रमाणात फॅट्स असतात, जे केसांचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात.

Coconut Milk Benefits
Life in NDA : एनडीएमधल्या कॅडेट्सचं आयुष्य कसं असतं ? इथे कसा मिळतो प्रवेश ?

ग्लोसाठी नारळाचे दूध-मधाचा मास्क लावा

केस निर्जीव झाले असतील तर ते चमकदार आणि मुलायम बनवण्यासाठी हेअर मास्क लावा. या हेअर मास्कमध्ये नारळाच्या दुधासोबत मध वापरा.मध बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म मॉइश्चरायझ करतात, केसांना चमक देतात आणि मऊ करतात.हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा वाटी नारळाचे दूध घ्यावे लागेल. या दुधात 2 चमचे मध टाका. हे संपूर्ण मिश्रण केसांमध्ये अर्धा तास ठेवा आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा.

Coconut Milk Benefits
Pregnency Tips : प्रेग्नेंट आहात? तर मग नक्की खा ही फळ

मऊ केसांसाठी साधा मास्क लावा

जर तुम्हाला केसांवर नैसर्गिक कंडिशनर वापरायचे असेल तर ही पद्धत फॉलो करा. एका भांड्यात नारळाचे दूध घेऊन अर्ध्या केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा. यानंतर 20-25 मिनिटांनी केस धुवा. तुमचे केस मऊ होतील.

Coconut Milk Benefits
Pregnency Tips : अजब नियम! बाळंतपणात रडण्या-ओरडण्यावर आहे बंदी

कोंडा दूर करण्यासाठी नारळाचे दूध-लिंबू

डोक्यात कोंडा असल्यास अर्धी वाटी नारळाचे दूध घेऊन त्यात 2 चमचे लिंबाचा रस पिळून घ्या. हे मिश्रण सुमारे 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर त्यांना केसांवर 30 ते 45 मिनिटे ठेवा आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा. याच्या नियमित वापराने केसांतून कोंडा नाहीसा होतो.

Coconut Milk Benefits
Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

नारळाच्या दुधासोबत आवळा

नारळाचे दूध आणि आवळा हेअर मास्क बनवण्यासाठी आवळा पावडर एका भांड्यात घ्या. त्यात गरजेनुसार नारळाचे दूध मिसळा. त्यात कोणतेही आवश्यक तेल किंवा खोबरेल तेलाचे 2 ते 3 थेंब टाका. हा हेअर मास्क केसांवर 30 ते 35 मिनिटे ठेवा आणि धुवा. या हेअर पॅकमुळे केसांना पूर्ण पोषण मिळेल ज्यामुळे केसांना चमक येईल.

Coconut Milk Benefits
Holiday रविवारीच का असतो ? जाणून घ्या कारण

अशा प्रकारे नारळाचे दूध तयार केले जाते

ताज्या पिकलेल्या तपकिरी नारळापासून नारळाचे दूध काढले जाते. बर्‍याच आशियाई देशांमध्ये, सूप, सॉस आणि मिष्टान्नसाठी ते फार पूर्वीपासून वापरले जात आहे. हे भारतीय, थाई, हवाईयन आणि दक्षिण अमेरिकन पाककृतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

Coconut Milk Benefits
Vaginal Health : योनिमार्गातील कोरडेपणा कसा दूर कराल ?

अलीकडच्या काळात नारळाचे दूध खूप लोकप्रिय झाले आहे. नारळाचे दूध गाई किंवा म्हशीच्या दुधाला चवदार आणि आरोग्यदायी पर्याय मानले जाते. कारण त्याचे फायदे देखील आहेत. नारळाचे दूध दिसायला खूप घट्ट आणि मलईदार असते. नारळाचे दूध नारळाच्या पाण्यासारखे नैसर्गिकरित्या आढळत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com