कुटुंबाबरोबरचा संवाद प्रेरणादायी

शारिरिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी मी शक्य तितके घरी बनविलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करते. त्यात भाकरी, चपाती, भाजी, डाळ, भात, सँडविच आणि सॅलडचा समावेश असतो.
Communication with family
Communication with familysakal

- रचना मिस्त्री, अभिनेत्री

शारिरिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी मी शक्य तितके घरी बनविलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करते. त्यात भाकरी, चपाती, भाजी, डाळ, भात, सँडविच आणि सॅलडचा समावेश असतो. मला काकडी, टोमॅटो, गाजर यांमध्ये चवीसाठी डाळिंब आणि काही सॉस, मध घालायला आवडते. मी शक्यतो बाहेर खाणे टाळते. मानसिक आरोग्यासाठी मी माझे कुटुंब आणि मित्रांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

सध्या मी सोनी टीव्हीवरील ‘दबंग मुलगी आयी रे आयी’ या मालिकेत अभिनय करीत आहे. चित्रीकरणामुळे सुट्ट्या मिळणे हे एक आव्हान आहे. मात्र, मी सेटवरील माझे सहकारी अभिनेते आणि क्रू यांच्याबरोबर खूप गप्पा मारते, त्यामुळे काम आनंददायी होते.

मी सुट्टी मिळाल्यावर बाहेर जाण्यापेक्षा माझ्या कुटुंबासोबत घरी राहणे पसंत करते. माझ्या आईसोबत वेळ घालविण्यात मला आनंद मिळतो आणि काम लवकर पूर्ण केल्यावर बहिणीशी गप्पा मारणे पसंत करते. कुटुंब आणि भावंडांसोबतचे संवाद माझे मानसिक आरोग्य स्थिर ठेवण्यास मदत करतात.

व्यायाम आणि आहार

मला जिममध्ये नियमितपणे जाण्यास वेळ मिळत नाही, कारण जेव्हा तुम्ही १२-१३ तासांच्या शिफ्टमध्ये काम करत असाल आणि तुमच्या प्रवासाला २-३ तास लागतो, तेव्हा उरलेल्या वेळात झोप, अंघोळ, जेवण आणि इतर गोष्टी कराव्या लागतात. पूर्वी माझे घर सेटजवळ होते, तेव्हा मी घरी व्यायाम करायचे.

दूर राहायला गेल्याने आता ते शक्य होत नाही. सुट्टी असताना मी जिमला जाते. मी दररोज सकाळी सूर्यनमस्कार घालते, ध्यानधारणेसारखे प्रयोग करते. एका खोलीत शांतपणे बसून दिवे मंद करते, मंद संगीत सुरू ठेवते. त्यातून मला मानसिक स्वास्थ्य मिळते.

शाळेत असताना दुपारी दोन वाजता जेवणाची वेळ होत असे. त्यावेळी मी जेवण करत असे. मात्र, चित्रीकरणामुळे आहार घेण्याच्या वेळेत थोडाफार बदल होतो. सेटवर यायला अनेकदा उशीर झाल्यामुळे आणि इतर कारणांमुळे मी माझा जेवणाचा डबा आणू शकत नव्हते. परिणामी बाहेरचे पदार्थ खात असे आणि त्यानंतर मी आजारी पडले. तेव्हापासून मी स्वतःसाठी एक नियम बनवला आहे की, आपण आपल्या आरोग्याशी तडजोड करायची नाही.

तेव्हापासून मी घरी बनवलेलेच अन्नपदार्थ खाते. मी दररोज सकाळी नाश्ता करते आणि माझी आई मला जेवणाचा डबा देते. संध्याकाळी सँडविच आणि घरून काहीतरी आणलेले खाते. सकाळी रिकाम्यापोटी ग्रीन टी किंवा कोमट पाणी पिते, ज्यामुळे माझे पोट स्वच्छ होते आणि मला ऊर्जा मिळते.

सुदृढ आरोग्याबाबत टिप्स...

1) तुमचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शक्य तितक्या व्यायामाचा प्रयत्न करा. योगा करा, तुम्हाला योग्य वाटेल अशा पद्धतीने व्यायाम करा, फिरायला जा.

2) अनेकवेळा आपण म्हणतो की, माझे शरीर दुखते. कारण आपण फारशा शारीरिक हालचाली करत नाही.

3) शक्यतो बाहेरचे अन्न टाळा. घरी बनवलेले अन्न खा.

4) आपल्या शरीरात जास्तीत जास्त पाणी कसे जाईल, याचा विचार करा.

5) तुम्ही गुबगुबीत असल्यास तुम्हाला लठ्ठ म्हणतील, पण माझ्यासाठी निरोगी असणे म्हणजे वजन कमी असणे नाही. शरीर लवचिक असणे निरोगीपणाचे लक्षण आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com