Electricity: अशी होते वीज बिलाची आकारणी, वाचा सविस्तर

Electricity: विनाकारण लाइट, टीव्ही, फॅन, एसी जास्त वेळ चालू ठेवल्यास महिन्याला अतिरिक्त भुर्दंड बसू शकतो.
Electricity
ElectricitySakal

Consumers should be careful while using electricity

समजा तुमचा दर महिन्याचा वीज वापर शंभर युनिट आहे, तर सध्याच्या बिलात दरमहा ४९ रुपये, तर वर्षभराच्या बिलात ५८८ रुपयांनी वाढ होणार आहे. वापर ३०० युनिट असेल तर दरमहाच्या वीजबिलात ८४७ रुपयांनी तर वर्षभराच्या बिलात १० हजार १६४ रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज वापरताना काळजी घ्यायला हवी. विनाकारण लाइट, टीव्ही, फॅन, एसी जास्त वेळ चालू ठेवल्यास महिन्याला अतिरिक्त भुर्दंड बसू शकतो.

  • अशी होते बिलाची आकारणी

शंभर युनिटपर्यंत तुमचा वीजवापर असेल तर प्रतियुनिट जो दर निश्‍चित केला आहे त्या दराने शुल्क आकारले जाते

शंभर युनिटच्या वर एक युनिट जरी तुमच्या विजेचा वापर झाला तर शंभर युनिटपर्यंत प्रतियुनिट निश्‍चित केलेला दर (नव्याने लागू झालेला प्रतियुनिट ५ रुपये ८८ पैसे) आकारला जातो.

शंभर युनिटच्या वरील एका युनिटसाठी दुसरा दर (म्हणजे नव्याने लागू केलेला ११ रुपये ४६ पैसे) लागू करून वीज आकार निश्‍चित केला जातो

वीज आकाराशिवाय स्थिर आकार, वीजवहन आकार (१.१७ रुपया प्रतियुनिट), इंधन समायोजन आकार, वीज शुल्क (स्थिर आकार, वीज आकार आणि वहन आकार यांची एकत्रित बेरीज करून त्या रकमेवर १६ टक्के) आणि वीज विक्री कर (प्रतियुनिट १ रुपया) अशी सर्वांची मिळून गोळाबेरीज करून वीजबिल आकारले जाते.

  • हे लक्षात ठेवा

सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ केल्याचे महावितरणकडून जाहीर करण्यात आले.

प्रत्यक्षात शंभर युनिट वापर असलेल्या ग्राहकांच्या दर महिन्याच्या वीजबिलात ६.१७ टक्क्यांनी वाढ होणार

तीनशे युनिट विजेचा वापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात दरमहा २४.७४ टक्क्यांनी वाढ होणार

पाचशे युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात दरमहा ३६.४४ टक्के वाढ होणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com