esakal | प्लेटलेट्स कमी होणं कोरोना नवं लक्षण?

बोलून बातमी शोधा

प्लेटलेट्स कमी होणं कोरोना नवं लक्षण?
प्लेटलेट्स कमी होणं कोरोना नवं लक्षण?
sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात कोरोना विषाणूने शिरकाव करुन आता एक वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही त्यावर ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. एकावर एक अशा कोरोनाच्या लाटा येत आहेत. यामध्येच कोरोनाची तिसरी लाटदेखील येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची सर्वसाधारण लक्षणं सगळ्यांनाच ठावूक आहेत. मात्र, डॉक्टर आणि वैज्ञानिक करत असलेल्या अभ्यासातून कोरोनाची नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. काही काळापूर्वी कोरोनाच्या सर्वसाधारण लक्षणांसोबतच पाच नवीन लक्षणं आढळून आली होती. मात्र, यावेळी पुन्हा एक नवीन लक्षण समोर आलं आहे. याविषयी 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी दोन व्यक्तींमध्ये प्लेट्सलेटची संख्या कमी झाली होती. त्यानंतर वैद्यकीय उपचार घेतल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. इतकंच नाही तर, अचानकपणे या दोघांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. मात्र, ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे पांढऱ्या पेशी कमी होणं हे कोरोनाचं नवीन लक्षण असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

हेही वाचा: काळजी घ्या! कोरोना विषाणूची आणखी तीन लक्षणं आली समोर

"प्रत्येक व्हायरल इन्फेक्शनमध्ये प्लेटलेट म्हणजे पांढऱ्या पेशींची संख्या कमी होत असते. त्यामुळे कधीही थकवा जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. सध्याच्या काळात थकवा जाणवला तर कोविड -१९ची चाचणी करुन घ्या. सध्या कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये पांढऱ्या पेशींची संख्या कमी होणे, डायरिया, डोळे लाल होणे, थकवा जाणवणे ही नवीन लक्षणं समोर आली आहेत", असं रेस्पिरेटरी मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रोफेसर संतोष कुमार यांनी सांगितलं.

"थकवा जाणवणं हे व्हायरल तापाचं लक्षण आहे. कोविडसुद्धा एक व्हायरल आजाप आहे. ज्यामुळे यात थकवा व ताप येतो. साधारणपणे एका व्यक्तीच्या शरीरात १.५ ते ४.५ लाख प्लेट्सलेट असतात. परंतु, काही प्रकरणांमध्ये या प्लेटलेट्सची संख्या ७५ हजार ते ८५ हजारांपर्यंत पोहोचते. त्यामुळे थकवा जाणवल्यास लगेचच कोविडची चाचणी करुन घ्या", असं RML इंस्टिट्यूड ऑफ मेडिकल सायन्सचे डॉ. विक्रम सिंह यांनी सांगितलं.

हेही वाचा: पेन ड्राइव्हलाही ठेवता येतो पासवर्ड; माहित आहे कसा?

दरम्यान, आझाद नगर पाडा रोड येथील अलीम शेख यांना १८ एप्रिल रोजी थकवा जाणवत होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी ब्लडटेस्ट केली. ही टेस्ट केल्यावर त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्स म्हणजे पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाली असून त्या ८५ हजारांवर आल्या आहे. साधारणपणे आपल्या शरीरात दीड ते साडे चार लाख पांढऱ्या पेशी असतात. पेशींची संख्या कमी झाल्यानंतर अलीम शेख यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधं सुरु केली. परंतु. त्यानंतर २३ एप्रिल रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. विशेष म्हणजे यावर पुन्हा त्यांनी ब्लड टेस्ट केली तर त्यांच्या पांढऱ्या पेशींची संख्या २० हजारांवर आली होती. त्यांची प्रकृती खालावत होती. परंतु, कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नव्हते. याच काळात त्यांचा मृत्यू झाला. अलीम शेखप्रमाणेच बालागंज येथील राजकुमार रस्तोगी यांच्यादेखील प्लेट्सलेट कमी झाल्या होत्या त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.