पॉझिटिव्ह एनर्जी! कोविड वॉर्डमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा भन्नाट डान्स

सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे
corona virus warriors dance
corona virus warriors dance

गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोनाचं संकट अद्यापही कमी झालेलं नाही. पहिली लाट जात नाही, तोच आता या विषाणूची दुसरीही लाट आली आहे. सध्याच्या काळात परिस्थिती पूर्वीपेक्षा जास्त बिकट आणि खडतर झाली आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर, बऱ्याच जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे, कोरोनाच्या या नकारात्मक वातावरणात रुग्णांना मानसिक स्थैर्य मिळावं व त्यांचं मनोबल वाढावं यासाठी कोव्हिड योद्ध्यांनी भन्नाट शक्कल लढवली आहे.

सध्या सोशल मीडियावर कोरोना योद्ध्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डॉक्टर व इतरेतर कर्मचारी चक्क कोविड वॉर्डमध्ये डान्स करत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाग्रस्तांचं मनोबल वाढावं आणि त्यांनी सकारात्मक विचार करावेत यासाठी रुग्णालयाच्या प्रशासनाने ही नवीन शक्कल लढवली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ गुजरातमधील एका रुग्णालयातील असून या रुग्णालयात सध्या कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णांमध्ये सकारात्मकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी "सोचना क्या जो भी होगा, देखा जाएगा", या गाण्यावर भन्नाट डान्स केला. हे गाणं १९९०मधील 'घायल' चित्रपटातील आहे.

corona virus warriors dance
COVID Tongue : ओठांभोवती पाच लक्षणं जाणवल्यास कोरोना चाचणी नक्की करा

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला असून त्याला तुफान लोकप्रियता मिळत आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांनी लढवलेल्या या युक्तीमुळे कोव्हिड सेंटरमधील प्रत्येक रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचं दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com