esakal | पेन किलर घेऊ नका! सध्याच्या काळात ठरु शकतं घातक

बोलून बातमी शोधा

पेन किलर घेऊ नका! सध्याच्या काळात ठरु शकतं घातक

पेन किलर घेऊ नका! सध्याच्या काळात ठरु शकतं घातक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सतत धावपळ, दगदग,कामाचा लोड याच्यामुळे अनेकदा डोकेदुखी, अंगदुखी अशा समस्या जाणवत असतात. परंतु, या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन आपण पेन किलर घेऊन हा त्रास तात्पुरत्या स्वरुपात कमी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सध्या कोविडच्या काळात या पेन किलर घेणं अत्यंत घातक ठरु शकतं. याविषयी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) याविषयी तशा सुचनाही दिल्या आहेत. याविषयी 'न्यूज १८.कॉम'ने त्यांच्या वृत्तात नमूद केलं आहे.

हृदयरोगींसाठी घातक मानली जाणारी पेन किलर आयब्रुफन ही घेतल्यास कोविडची लक्षणे गंभीर होण्याची शक्यता आहे. यामुळे किडनी खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नॉन स्टीरॉयड अॅटी इम्फ्लेमेटरी औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटामोल हे औषध घ्यावं, असा सल्ला देण्यात येत आहे.

हेही वाचा: चायनीज पदार्थात मीठ जास्त पडलं? ६ पद्धतीने करा कमी

आरोग्य संशोधन विभागानुसार, कोणतीही पेन किलर घेतल्यामुळे कोरोना होत नाही. तर,कोरोनाच्या लक्षणांमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या पेन किलरमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग या सारख्या समस्या असलेल्यांना त्रास होण्याची शक्यता असते. यामध्येच ICMR नुसार, आयब्रूफन सारख्या पेनकिलरमुळे कोरोनाची लक्षणं गंभीर होऊ शकतात. ज्यामुळे, त्याचा विपरित परिणाम किडनीवर होऊ शकतो.