लॉकडाउनमध्ये कार खरेदी फायद्याची; या कंपनीची छप्परफाड ऑफर वाचा! 

पीटीआय
गुरुवार, 21 मे 2020

दोन महिन्यांच्या कडक निर्बंधानंतर जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. देश लॉकडाऊन-4 मधून जात असला तरी केंद्र सरकारने आता अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे अनेक उद्योगधंदे, ऑफिस, सेवाक्षेत्रे सुरु होत आहेत. सरकारने दुचाकी आणि कार विक्रिलाही परवानगी दिली आहे.

दोन महिन्यांच्या कडक निर्बंधानंतर जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. देश लॉकडाऊन-4 मधून जात असला तरी केंद्र सरकारने आता अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे अनेक उद्योगधंदे, ऑफिस, सेवाक्षेत्रे सुरु होत आहेत. सरकारने दुचाकी आणि कार विक्रिलाही परवानगी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मात्र, लोकांची क्रयशक्ती कमी झाली असल्याने नवीन वाहन खरेदीकडे ग्राहक पाठ फिरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑटो कंपन्या शक्कल लढवताना दिसत आहेत. कंपन्या आकर्षक सेवा, योजना आणि ऑफर्स देऊन ग्राहकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्युंदाई कंपनीनेही भारतातील ग्राहकांना आकर्षक ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने मे 2020 साठी ग्राहकांना तब्बल 1 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्याची घोषणा केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कंपनी 1 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देत असली तरी ही ऑफर सर्वच ह्युंदाई कारसाठी नसणार आहे. पण जर तुम्ही ह्युंदाई सॅन्ट्रो, ह्युंदाई ग्रँड i10, ह्युंदाई ग्रँड i10 NIOS, ह्युंदाई  इलिट i20 किंवा ह्युंदाई इलँट्रा घेण्याच्या विचारात असाल तरी ही ऑफर तुमच्यासाठीच आहे. या गाड्यांवर नेमका किती लाभ मिळतोय हे आपण पाहूया.

1. ह्युंदाई सॅन्ट्रो : 30,000 ते 40,000 रुपयांपर्यंतचा तुम्हाला फायदा होऊ शकतो
2. ह्युंदाई ग्रँड i10: 45,000 रुपयांपर्यंत फायदा
3. ह्युंदाई ग्रँड i10 NIOS: 25,000 रुपयांपर्यंतचा लाभ
4. ह्युंदाई  इलिट i20: 35,000 रुपयांपर्यंतचा लाभ
5. ह्युंदाई इलँट्रा: 1 लाख रुपयांपर्यंतचा लाभ

कंपनी मे 2020 ऑफर्ससोबतच फायदेशीर वित्त साहाय्य योजनाही ग्राहकांना देऊ करत आहे. यात 3 महिन्यांसाठी कमी EMI , स्टेप अप योजना, बलून योजना, कमी डाऊन पेमेंट अशा काही योजना देत आहे. त्यामुळे ग्राहकांना कार खरेदीसाठी उत्तेजित करण्यासाठी कंपनीने कंबर कसल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे ह्युंदाई कंपनीने डॉक्टर, पोलीस कर्मचारी आणि अन्य कोरोना वॉरियर्ससाठी खास सेवा आणि ऑफर देऊ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीने देऊ केलेल्या या छप्परफाड ऑफर्सवर ग्राहक तुटून पडतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ग्राहकांनी कार खरेदीकडे वळावे यासाठी अन्य ऑटोसेक्टर कंपन्यांनीही खास ऑफर्स देण्यास सुरुवात केली आहे. एप्रिलमध्ये शून्य विक्री झाली असल्याने विक्री वाढवण्याचं आव्हान कंपन्यांसमोर असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown car companies giving offers