लॉकडाऊनमध्ये तुमच्या पुढच्या पिढीला काय देताय?

लॉकडाऊनमध्ये तुमच्या पुढच्या पिढीला काय देताय?

लॉकडाऊनमुळं अनेक कुटुंब आपल्या गावी परतली आहेत. तर, शहरातच विभक्त राहणाऱ्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय. या छोट्या काळासाठी का असेना अनेक घरांमध्ये तीन पिढ्या एकत्र राहत आहेत.  ही त्यांच्यासाठीसुद्धा एक सुवर्णसंधी आहे. याकाळात दोन पिढ्यांनी मिळून तिसऱ्या पिढीला काही शिकवण्याचा प्रयत्न करावा, असं तज्ज्ञ सांगत आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनमध्ये डेली रुटीन तयार करा
लॉकडाऊन कालावधीत मुलांसाठी दोन आठवड्यांचे डेली रुटीन तयार करा, असे एम्सचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नंद कुमार म्हणतात. यावेळी त्यांना मानसिकदृष्ट्या बळकट करण्याची गरज आहे.तसेच प्रत्येक परिस्थितीनुसार तयारी करण्याचीही गरज आहे. यावेळी, ते त्यांचे चित्रकला, लेखन, सामान्य ज्ञान इत्यादी सुधारू शकतात. मानसिकस्थिती सुधारण्यासाठी त्यांना घरातील काम सांगणे आवश्यक आहे. त्यांना घरगुती साफसफाई, भांडी धुण्यास वगैरे काम करू द्यावीत. एएसआयएससी बोर्डाचे कोषाध्यक्ष व हडर्ड शाळेचे प्राचार्य व्ही. व्हिन्सेंट म्हणतात की संपूर्ण कुटुंबासाठी एकत्र बसून रात्रीचे जेवण करणे हे सुद्धा महत्वाचे आहे. काही माहितीपर आणि मनोरंजक चित्रपट पाहिले पाहिजेत, जेणेकरून मुलांमध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येणार नाही. तसेच, मुलांचे डेली रुटीन खराब होऊ देऊ नका. युट्यूबवरील विविध लेक्चर्स त्यांना पाहायला सांगा.

एएसआयएससी बोर्डाचे सेक्रेटरी कोषाध्यक्ष आणि हडर्ड शाळेचे प्राचार्य के. व्ही. व्हिन्सेंट म्हणतात, या काळात मुलांची वाचनाची सवय देखील सुधारली जाऊ शकते. त्यांनी केवळ अभ्यासाची पुस्तके वाचणे आवश्यक नाही, त्यांनी ज्या गोष्टी माहिती वाढवतात त्या देखील वाचल्या पाहिजेत. व्हिन्सेंट सुचवतात की, मुलांना नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासही प्रेरित केले पाहिजे.

व्यायामावर लक्ष द्या
लॉकडाउनच्या वेळी, मुलांची शारीरिक क्रिया कमी होण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. डॉ. नंद कुमार म्हणतात की मुलांना निरोगी आहार देण्याची आणि जंक फूडपासून दूर ठेवण्याची गरज आहे. मुलांना व्यायाम, योग, सारख्या शारीरिक हालचाली मुलांना दिल्या पाहिजेत. व्हिन्सेंट मुलांच्या शारिरीक हालचालींवर म्हणतात की, मुलांसमवेत घरी काही खेळ खेळा, ज्यामुळे त्यांचे शरीर तंदुरुस्त राहील. या प्रकारे मुलांसोबत आपला लॉकडाऊनचा वेळ व्यतीत केल्यास मुलांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारता येईल. काहीजण लॉकडाऊनविषयी तक्रार करत आहेत. पण, या निमित्तानं तुम्हाला कधी नव्हे तो तुमच्या मुलांसोबत वेळ घालवायला मिळत आहे. असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com