लॉकडाऊनमध्ये घरात मुलांशी कसं वागताय? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

मुलांच्या प्रश्नांची उत्तरे कसे द्यायची, त्यांच्या सोबत कसा वेळ घालवायचा अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधत असाल तर या गोष्टी सहज कश्या करता येतील हे आपण आज पाहणार आहोत.

मुलांच्या प्रश्नांची उत्तरे कसे द्यायची, त्यांच्या सोबत कसा वेळ घालवायचा अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधत असाल तर या गोष्टी सहज कश्या करता येतील हे आपण आज पाहणार आहोत. कोरोना विषाणूबद्दल सर्व प्रकारची माहिती आता जगभरात उपलब्ध होत आहे. योग्य आणि चुकीच्या माहितीमधील फरक आपण समजू शकता, परंतु असे करणे मुलांसाठी बर्यालच वेळा कठीण असते. अशा परिस्थितीत आपल्या मुलास अचूक व वस्तुस्थितीची माहिती पोहोचवणे महत्वाचे आहे. आजकाल आपण घरी असल्याने, कोरोनामधील मुलांबद्दल वैज्ञानिक समज विकसित करणे सोपे आणि आवश्यक आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोकळेपणाने बोला आणि त्यांचे ऐका
तुमच्या मुलांशी कोरोनासारख्या विषयांवर मोकळेपणाने बोला. त्यांना या समस्येबद्दल काय माहित आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. चित्रकला, गोष्टी इत्यादी माध्यमातून त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अशात सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे मुलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे असे कधीही होऊ देऊ नका. युनिसेफच्या तज्ञांच्या मते, मुले आपल्याला अनेक प्रश्न विचारू शकतात ज्यासाठी आपण तयार असणे आवश्यक आहे,  त्यातील काही प्रश्न हे सुद्धा असू शकतील,

१.    माझी शाळा का बंद आहे?
२.    विषाणू म्हणजे काय?
३.    तो कसा दिसतो?
४.    तो कुठे लपतो?
५.    मी घरातच का बसायचे आहे?
६.    मी काय करू शकतो?
७.    मला वारंवार हात का धुवायचे आहेत?
८.    मी माझ्या मित्रांसह बाहेर का जाऊ शकत नाही? 

पालकांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो ज्यामध्ये मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण असते. या गोष्टी मुलांना पालकांनी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पालक म्हणून लक्षात ठेवा की कोरोना विषाणूबद्दल मुलांशी बोलण्यापूर्वी आपली माहिती शक्य तितकी पूर्ण ठेवा. सरकारने दिलेला सल्ला यावर लक्ष ठेवा. युनिसेफचे जेकब हंट म्हणतात की मुलांसोबत बोलताना त्यांच्या वयानुसार भाषेचा वापर केला पाहिजे. त्यांचे हातवारे पहात रहा. आपल्याकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नसल्यास अंदाजे उत्तर देऊ नका. आपण डब्ल्यूएचओ, युनिसेफ, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून हि माहिती घेणे महत्वाचे आहे.

coronavirus: कोरोनासह इतर आजारांनी 78 टक्के रुग्णांचा मृत्यू 

एम्सचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नंद कुमार म्हणतात की मास्क लावल्याने काय घडते, विषाणूचा संसर्ग कसा पसरतो, सामाजिक अंतर म्हणजे काय याची माहिती मुलांना दिली पाहिजे. डॉ कुमार म्हणतात की, मुलांना कोणती माहिती द्यावी  व कोणती देऊ नये हे माहित असणे फार महत्वाचे आहे. विषाणूपासून कसे दूर रहायचे ते सांगून त्यांना नेहमी संयमी व सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे.

कोरोनाचा फटका मुकेश अंबानी यांना; संपत्ती होतेय मोठी घसरण

जेव्हा आपण आपल्याभोवती आणि टीवी मध्ये अनेक असामान्य घटना घडताना पाहतो तेव्हा असे दिसते की हे ठीक होत नाही आहे, मुलांसाठी कोणते चित्र योग्य आहे हे ठरवणे फार कठीण आहे. एम्सचे मानसोपचार तज्ज्ञ रोहित वर्मा म्हणतात की मुलांना नकारात्मक बातम्यांपासून दूर ठेवणे फार महत्वाचे आहे. ८ वर्षापेक्षा जास्त वयाची मुले तंत्रज्ञानात खूप प्रगत आहेत. अशा परिस्थितीत, त्यांना खेळ, व्यायाम किंवा काही सकारात्मक गोष्टीशी जोडणे आवश्यक आहे. वर्मा सांगतात की सध्याच्या आपत्तीच्या टप्प्यात जिथे पालक कामावर आहेत आणि मुले कोचिंग-शिक्षण आणि शाळेत व्यस्त आहेत, त्या लॉकडाऊनमध्ये काही चांगले क्षण घालवावेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus how to handle kids during lockdown period information Marathi