esakal | फुफ्फुसच नव्हे शरीरातील 'या' भागांवरही होतो कोरोनाचा परिणाम

बोलून बातमी शोधा

Corona
फुफ्फुसच नव्हे शरीरातील 'या' भागांवरही होतो कोरोनाचा परिणाम
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाने देशात शिरकाव करुन आता एक वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. एकावर एक अशा दोन लाटा या विषाणूच्या आल्या असून त्यातच आता तिसरी लाटदेखील येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर त्याचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसांवर होतो असं म्हटलं जातं. परंतु, केवळ फुफ्फुसच नव्हे तर शरीरावरील इतर अवयवांवरही त्याचा परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. हेल्थ एक्स्पर्टच्या मतानुसार, कोरोनामुळे शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ज्यामुळे त्याचा परिणाम इतर अवयवांवर होतो. त्यामुळे कोणत्याही किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा असंही वारंवार प्रशासन व तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

१. हृदयावर परिणाम -

ज्यांना हृदयाशी निगडीत एखादी समस्या असेल किंवा ज्यांची मेटाबॉलिज्म सिस्टीम खराब असेल त्यांना कोविडनंतर होणाऱ्या परिणामांची भीती अधिक असते. SARs-COV-2 मुळे कोरोना रुग्णांच्या हृदयातील मांसपेशींना सूज येते.

हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशननुसार, कोरोनाची लक्षणं तीव्र झाल्यानंतर ज्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे, त्यांच्यामध्ये हृदयाशी निगडीत समस्या जास्त असल्याचं दिसून आलं. यात हृदयाचे अनियमित ठोके, हृदयाची धडधड वाढणे, छातीत दुखणे, थकवा जाणवणे अशी लक्षणं पाहायला मिळाली.

हेही वाचा: प्लेटलेट्स कमी होणं कोरोना नवं लक्षण?

२. न्यूरोलॉजिकल समस्या-

अनेक रुग्णांमध्ये मानसिक समस्या, भ्रम, डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक दिसणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत.

३. किडनी खराब होणे -

अन्य लक्षणांप्रमाणेच किडनी खराब होण्याचीही समस्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. SARS-CoV-2 पेशींवर आक्रमण करतात, ज्या स्पाइक प्रोटिन ACE2 रिसेप्टर्सशी संबंधित असतात. त्यामुळे किडनी व अन्य पेशींवरही त्याचा परिणाम होतो. या किडनीला सूज येणे, युरीनची मात्रा कमी होणे अशा समस्या निर्माण होतात.

४. रक्ताच्या गुठळ्या -

कोविड -१९ मुळे शरीरात अनेक ठिकाणी सूज येते. ज्यामुळे शरीरातील रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता असते. सध्या या विषयी विस्तृत अभ्यास केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, कोविड झाल्यानंतर विषाणूचा प्रभाव अन्य पेशींवरही होत असतो. ज्यामुळे प्रोटीन ब्लडमधील गुठळ्या वाढतात. यात केवळ फुफ्फुसच नाही तर पाय,शिरा यांच्यामध्येही रक्ताच्या गुठळ्या होतात.

५. प्रकृती सुधारणा होण्यास वेळ -

कोविडमुळे शरीरातील प्रत्येक अवयव, भागांवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे रिकव्हरी होण्यास वेळ लागतो. तसंच फुफ्फुसांप्रमाणेच हृदय आणि मेंदूवरही त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे प्रकृती सुधारण्यासाठी वेळ लागतो.