Sex Life: कपल्सने कधीच विसरू नये सेक्सचे 'हे' पाच नियम | Relationship Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sex life

Sex Life: कपल्सने कधीच विसरू नये सेक्सचे 'हे' पाच नियम

प्रत्येक कपल्सला त्यांची मॅरिड लाइफ चांगली असावी, अशी इच्छा असते. यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. मात्र तरी सुद्धा त्यांना त्यांच्या मॅरिड लाइफमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

प्रत्येक नात्यात एकमेकांविषयी आदर, विश्वास आणि प्रेम या सर्वात महत्त्वपुर्ण गोष्टी असतात. मात्र या सोबतच सेक्सलाईफही तितकीच स्ट्राँग असणे आवश्यक आहे. पण तुम्हाला सेक्स लाईफचे हे पाच रुल माहिती आहे का? आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Sex Life मध्ये 'या' पाच चुका तुम्ही करताय का? आताच थांबवा, नाहीतर..

इच्छेविरोधात सेक्स करु नये

इच्छेविरोधातील सेक्सला मॅरिटल रेप म्हणतात. त्यामुळे कधीच सेक्स करताना पार्टनरच्या इच्छेविरोधात सेक्स करू नये.

अश्लील बोलू नये

सेक्स करताना प्रेमळ भावना व्यक्त करा. कधीच अश्लील बोलू नये किंवा शिविगाळी करू नये. तुमचा पार्टनर दुखावेल असं वर्तन करू नये. सेक्स ही भावना आहे, त्याप्रमाणे वागा.

हेही वाचा: Sex Life: तुम्हालाही Sex Addiction आहे का? कसं ओळखाल? 'ही' आहेत लक्षणे

सुरक्षितेसंबंधी काळजी घ्या

सुरक्षितेसंबंधी काळजी घ्या. कंडोम तुमच्याकडे नसेल तर त्यादिवशी सेक्स करू नका. तुमच्या भावनांवर आवर घाला.

पॉर्न फिल्म्सचं अनुकरण करू नका

अनेकदा तुम्ही तुमच्या पार्टनरला पॉर्न फिल्म्स पाहून तसेच करायला सांगता. पण हे चुकीचं आहे. पॉर्न फिल्म्सचं अनुकरण करू नका. सेक्स करताना दोघांच्याही भावना महत्त्वाच्या आहे.

हेही वाचा: Sex Life: ‘या’ तिथींना सेक्स करणं अशुभ

दोघांचा सहभाग असावा

सेक्स जर एकाच्याच इच्छेनुसार होत असेल तर कालांतराने तुम्हाला सेक्स लाईफ बोरींग वाटायला लागेल त्यामुळे नेहमी सेक्स करताना दोघांचाही सहभाग असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही ऑर्गेझमचा आनंद घेऊ शकाल.