Sex Life मध्ये 'या' पाच चुका तुम्ही करताय का? आताच थांबवा, नाहीतर.. | Relationship Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sex life

Sex Life मध्ये 'या' पाच चुका तुम्ही करताय का? आताच थांबवा, नाहीतर..

Relationship Tips: नात्यात अनेकदा सेक्स लाईफ मध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एक वेळ अशी येते की सेक्स लाईफ बोरींग वाटते. पण तुम्हाला माहिती आहे का अशा काही चुका आपण करत असतो ज्याचा थेट परिणाम आपल्या सेक्स लाईफ वर होत असतो. त्या चुका कोणत्या? याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (Sex Life News)

हेही वाचा: Sex Life: तुमच्या दररोजच्या 'या' चुकीच्या सवयी तुमची सेक्स लाईफ बोरींग करताहेत का?

घाई करू नका -

सेक्स दरम्यान कोणत्याही प्रकारची घाई करू नका. यामुळे नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो. सेक्स करण्यापूर्वी फोरप्ले करुन पार्टनरला तुमच्यासोबत नॉर्मल करा. घाई केल्याने गोष्टी आणखी बिघडण्याची शक्यता असते.

झोप अपूर्ण असणे -

अपुऱ्या झोपेचा आपल्या सेक्स लाईफ वर गंभीर परिणाम पडतो. त्यामुळे पुरेपुर झोप घेणे आवश्यक आहे. झोप पुर्ण न झाल्याने आपल्याला थकल्यासारखं वाटतं ज्याचा थेट परिणाम आपल्या सेक्स लाईफ वर पडतो.

हेही वाचा: Sex Life: तुमच्या दररोजच्या 'या' चुकीच्या सवयी तुमची सेक्स लाईफ बोरींग करताहेत का?

सेक्स लाईफमध्ये समाधानी नसणे -

अनेकदा सेक्स केल्यानंतरही काही लोकांना समाधान मिळत नाही. अशा वेळी पार्टनरशी बोलून यावर चर्चा करावी. तुम्ही सेक्स लाईफ विषयी काय विचार करता. याबाबत पार्टनरसोबत मनमोकळेपणाने संवाद साधा जेणे करुन तुम्हाला चुका सुधारता येईल आणि तुमची सेक्स लाईफ अधिक सुसह्य होणार.

इमोशनची कमतरता असणे -

कोणतेही नाते इमोशन शिवाय काहीच नाही. त्यामुळे नात्यात इमोशन असणे, खूप गरजेचे आहे. सेक्स केवळ आनंदाचा भाग नाही तर एक इमोशनसुद्धा आहे. त्यामुळे सेक्स लाईफ मध्ये पार्टनरच्या इमोशनचाही विचार करा तरच तुमची सेक्स लाईफ उत्तम राहील.

हेही वाचा: Sex life: सतत मनात सेक्सचे विचार येतात? असा घाला आवर

पार्टनरसोबत वाद घालणे -

पार्टनरसोबत झालेला किरकोळ वादही कधी कधी सेक्स लाईफवर गंभीर परिणाम करू शकतो. त्यामुळे जर पार्टनरसोबत भांडण झाले असेल तर वेळीच पार्टनरसोबत बोला आणि भांडण मिटवा. याचा सेक्स लाईफ परिणाम पडू नये, याची काळजी घ्या.