Damage Hair : तुमचे केस खराब झालेत का? हे कसं ओळखाल

केस खराब होण्याची कारणे काय आहेत?
Damage Hair
Damage Hairesakal

Damage Hair : 

धूळ, प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि घाम यांमुळे केस खराब आणि कोरडे होऊ लागतात.  खराब झालेले केस दुरुस्त करण्यासाठी लोक वेळोवेळी स्पासारखे उपचार घेतात. पण हे उपचार महाग असू शकतात. तसेच वारंवार पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. 

केसांची काळजी न घेतल्याने अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. यामध्ये केसांना फाटे फुटणे, केस कोरडे होणे, केसांमध्य कोंडा होणे सर्व गोष्टींचा समावेश आहे. तुम्ही केलेल्या काही सामान्य चुकांमुळे केस खराब होऊ लागतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की केस खराब झाले आहेत हे कसे कळेल. 

नुकतीच त्वचारोगतज्ज्ञ आंचल पंतने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने केस खराब होण्याची कारणे सांगितली आहेत. 

Damage Hair
Hair Care Tips: या पदार्थांमुळे बिघडू शकतं केसांचं आरोग्य, म्हणून आजच आहारातून दूर करा...

केस विंचरणे हा केसांच्या काळजीचा खूप महत्त्वाचा भाग आहे. केस विंचरण्यासाठी निवडलेला कंगवाही केसांचे मोठे नुकसान करू शकतो.

कोरडे केस

काही लोकांचे केस नैसर्गिकरित्या कोरडे असतात, परंतु जर तुमचे केस कालांतराने कोरडे होऊ लागले तर याचा अर्थ केसांची स्थिती बिघडू लागते.

जर तुमचे केस कोरडे होऊ लागले तर समजून घ्या की केसांचे नुकसान सुरू झाले आहे. कोरडे केस सहजपणे तुटणे आणि गळणे सुरू होते. कोरड्या केसांमुळे केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. कोरड्या केसांमध्ये ओलावा नसतो, ज्यामुळे केसांची मूळे डॅमेज होतात.

Damage Hair
Hair Care Tips : केसगळती रोखण्यासाठी या पानांचा वापरा हेअरमास्क, केस होतील लांबसडक

कुरळे केस

हिवाळ्यात केस कुरळे होण्याची समस्या जास्त असते. काही लोकांना ही समस्या नेहमीच असते. केस खराब झाले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी, तुम्हाला हेअर स्ट्रँड ओढावे लागेल. जर तुमचे केस निरोगी असतील तर ते ताणले जातील. जर स्ट्रँड ओढल्याशिवाय तुटला तर तुमचे केस खराब झालेत असे समजावे.

केस खराब झाले की ते अधिक कुरळे व्हायला लागतात
केस खराब झाले की ते अधिक कुरळे व्हायला लागतातesakal
Damage Hair
Hair Care Tips : हिवाळ्यात कलर केलेल्या केसांची अशी घ्या काळजी, फॉलो करा ‘या’ टिप्स

केस तुटणे

जेव्हा केसांची मूळे खराब होतात तेव्हा केस तुटण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे केस फुटतात आणि केस लहान होतात. टाळूमध्ये कोरडेपणा आणि कोणत्याही प्रकारच्या दोषामुळे ही समस्या उद्भवते. जेव्हा तुमच्या केसांचा रंग बदलू लागतो आणि स्प्लिट एंड्स दिसू लागतात, तेव्हा केस तुटणे सुरू होते.

स्प्लिट एन्ड्समुळे केस निरुपयोगी तर दिसतातच पण त्यांची वाढही खुंटते. केसांची स्टाईल करण्यासाठी हीट टूल्स वापरली जातात, ज्यामुळे केसांमध्ये ओलावा नसतो. केसांची आर्द्रता कमी झाली की केस फुटू लागतात.

स्प्लिट एंड्सची समस्या हे केस खराब होण्याचे एक कारण आहे. त्यामुळे केस कोरडे होण्यापासून वाचवा. केसांची चांगली काळजी घेतली पाहिजे.  

Damage Hair
Hair Care Tips : केसांची वाढ खुटलीय, केस गळतायतंय तर आम्ही सांगितलेला हा उपाय करा फरक अनुभवा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com