Deep Sleep Techniques : गाढ झोपेसाठी Military Method च्या 'या' तीन टिप्स करा फॉलो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deep Sleep Techniques

Deep Sleep Techniques : गाढ झोपेसाठी Military Method च्या 'या' तीन टिप्स करा फॉलो

अनेकदा असं होतं की आपल्याला रात्री उशीरापर्यंत झोप येत नाही आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेकजण गाढ आणि चांगल्या झोपेसाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात पण काहीही फायदा होत नाही. आज आम्ही तुम्हाला Military Method च्या तीन स्टेप्स सांगणार आहोत. या स्टेप्सद्वारे तुम्ही गाढ झोप घेऊ शकता.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण देशाचे जवानसुद्धा या टिप्स फॉलो करतात. जर तुम्ही या मेथडला फॉलो कराल तर तुम्हाला काही मिनिटांमध्येच गाढ झोप लागणार. (Deep Sleep Techniques Military Method three tips healthy lifestyle )

झोपायच्या आधी चेहरा धुवा

झोपायच्या आधी जर चेहरा थंड पाण्याने धूतला तर तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि थकवा दूर होणार. ज्यामुळे तुम्हाला गाढ झोप येऊ शकते. जर तुम्ही ही मेथड फॉलो केली तर बेड वर पडताच तुम्हाला मिनिटांमध्ये झोप येणार.

झोपायच्या आधी फोन दूर ठेवा

अनेक लोकांना झोपायच्या आधी फोन वापरायची सवय असते पण ही सवय खूप चुकीची आहे. झोपायच्या अर्धा तासाआधी तुम्ही फोन दूर ठेवला पाहिजे. असं केल्यास मन शांत राहतं आणि आपल्याला सहज झोप येऊ शकते.

पायाला आराम द्या

दिवसभराच्या कामामुळे पाय खूप जास्त थकले असतात. अशात सरळ झोपणे खूप जास्त गरजेचे असते ज्यामुळे तुमच्या पायाला चांगला आराम मिळेल. असं केल्यास तुम्हाला काही वेळातच गाढ झोप येणार.

टॅग्स :lifestyleSleep health