World Sleep Day 2023 : भारतातली ही कंपनी देतेय चक्क झोप आली म्हणून सुट्टी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Sleep Day 2023

World Sleep Day 2023 : भारतातली ही कंपनी देतेय चक्क झोप आली म्हणून सुट्टी...

World Sleep Day 2023 : बाकी काही करो वा न करो, HR कडे सुट्टी मागायला गेलो की नकार मात्र फिक्स असतो. कारण सततचं workload, अर्थात यात किती तथ्य असतं हे त्या त्या एम्प्लॉयीला चांगलं माहिती असतं. ऑफिसमधल्या एम्प्लॉयीला अनेक प्रकारच्या सुट्या दिल्या जातात. यामध्ये सिक लिव्ह, EL आणि CL यांचा समावेश होतो. पण अनेकदा ऑफिसमधल्या कामाच्या ताणामुळे लोकांना सुट्टी मिळत नाही.

नुकताच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. यामध्ये ट्विटरचा एक कर्मचारी ऑफिसमध्ये पलंगावर झोपलेला दिसला. पण तरीही दुपारची वेळ, हे असं संमिश्र वातावरण, कधीच पूर्ण न होणारी झोप आणि पोटात गेलेलं गरमागरम जेवण, साधारण २ वाजेनंतर खूप झोप येयला लागते. तुम्हाला ऑफिसमध्ये झोपायला सुट्टी दिली तर काय म्हणाल? एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना झोपण्याची रजा दिली आहे. ही विदेशी कंपनी नसून भारतीय कंपनी आहे.

आज, वर्ल्ड स्लीप डे २०२३ रोजी, बेंगळुरूच्या कंपनीने आपल्या एम्प्लॉयीला ही अनोखी भेट दिली आहे. कंपनीने सर्वांना इंटरनॅशनल स्लीप डे (world sleep day 2023) रोजी सुट्टी दिली आहे जेणेकरून ते झोपू शकतील. कंपनीने सांगितले की, हे जाहीर करताना आनंद होत आहे की, शुक्रवार, १७ मार्च २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय स्लीप डे निमित्त वैकल्पिक सुट्टी देण्यात आली आहे.

वेकफिट सोल्युशन्स ही एक कंपनी आहे जी कर्मचाऱ्यांना झोपेचा ब्रेक देते. होम फर्निशिंग कंपनी, वेकफिट सोल्युशन्सने जागतिक झोप दिनानिमित्त लिंक्डइनवर मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा मेल कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवला आहे. या मेलमध्ये वेकफिटसोबत झोपेची अद्भुत भेट अनुभवा असे लिहिले आहे.

अर्ध्या तासाचा मिळतोय ब्रेक

गेल्या वर्षी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी "राईट टू नॅप पॉलिसी" जाहीर केली होती. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत ३० मिनिटे झोपण्याची मुभा देण्यात आली होती. कंपनीच्या मते, दुपारची झोप शरीराला रिचार्ज करण्यास आणि कामावर पुन्हा फोकस करण्यास मदत करते. यामुळे कामाच्या ठिकाणी गुणवत्ताही सुधारते.

नक्की का सेलिब्रेट करतात वर्ल्ड स्लीप डे 2023 :

निरोगी राहण्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. पण आजच्या धावपळीच्या काळात लोकांच्या झोपेवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. चांगली झोप आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते. झोपेशी संबंधित या सर्व समस्या लक्षात घेऊन वर्ल्ड स्लीप सोसायटीने स्लीप डे सुरू केला. हा दिवस २००८ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. सध्या जगभरातील ८८ हून अधिक देशांमध्ये जागतिक झोप दिवस साजरा केला जात आहे.