Desi Ghee Benefits: नेहमीच्या आजारांची होईल सुट्टी, जर देशी तुपाशी कराल गट्टी

वारंवार आजारी पडणाऱ्याला देशी तूप करेल ठणठणीत, कसे वापरायचे ते पहा!
Desi Ghee Benefits:
Desi Ghee Benefits:esakal

Desi Ghee Benefits: आजच्या काळात लोकांच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बदलत्या ऋतूत ते लवकर आजारी पडतात. अशा वेळी पौष्टिक आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे देशी तुपाला सुपरफूड असेही म्हटले जाते. पण आज आम्ही तुम्हाला देशी तूप खाण्याचे काही वेगळे मार्ग सांगणार आहोत.

तूप खाण्याचे असंख्य फायदे प्राचीन काळापासून सांगितले गेले आहेत. आमच्या आजी अनेकदा डाळ आणि पोळीमध्ये तूप टाकून जेवणाला देत असत. कारण तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. शुद्ध देशी तुपात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-ई, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतात.

Desi Ghee Benefits:
Benefits Of Ghee: केसांना तूप लावण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे...

जेवणात तूप घातल्याने त्याची चव अनेक पटींनी वाढते. तसेच तुपाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते. ज्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकत नाही.

सकाळी रिकाम्या पोटी देशी तूपाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतील. दररोज अशा प्रकारे आहारात देशी तुपाचा समावेश केल्यास अनेक आजारांपासूनही तुम्ही दूर राहाल. चला तर मग जाणून घेऊया निरोगी राहण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी तूप का खावे. (Desi Ghee)

Desi Ghee Benefits:
Ghee For Face : काळवंडलेल्या चेहऱ्यासाठी क्रिम,पार्लर ट्रिटमेंट करून झालं असेल तर एकदा देशी तूप लावा, फरक पडतो!

पचनसंस्था सुधारते

बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर बदलत्या ऋतूत आहारात देशी तूपाचा वापर करा. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन सुरू करावे. देशी तूपाचे सेवन केल्याने तुमची बद्धकोष्ठता, सूज येणे आणि पोटदुखीची समस्या काही दिवसात बरी होऊ शकते. खरं तर तुपात ब्युटिरिक अॅसिड आढळतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. एक ग्लास कोमट पाण्यासोबत एक चमचा देशी तूप प्या.

सांधेदुखी

तुपात ओमेगा-३ फॅटी अॅसिड पुरेशा प्रमाणात असते. त्यामुळे रिकाम्या पोटी याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच तूप खाल्ल्याने सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. कारण तूपामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते आणि हाडेही निरोगी राहतात.

Desi Ghee Benefits:
Ghee For Face : काळवंडलेल्या चेहऱ्यासाठी क्रिम,पार्लर ट्रिटमेंट करून झालं असेल तर एकदा देशी तूप लावा, फरक पडतो!

इम्युनिटी बूस्टर

तुपाचे फायदे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास अनेक पटींनी वाढतात. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दररोज एक चमचा तुपाचा आहारात समावेश करावा. तूप हेल्दी फॅट्सने समृद्ध आहे. तूपात असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

तूपाचे सेवन कसे करावे?

आरोग्याच्या तक्रारींचा पाढा संपत नसेल तर तुम्हाला तूप फायद्याचं ठरू शकतं हे तर तुम्ही ऐकलंत. आता त्याचे सेवन कसे करावे हे पाहुयात. तूपाचे रोज सेवन करावे असे सांगितले जाते. तुम्ही ते जेवणात वापरू शकता. तसेच, चांगल्या परिणामांसाठी तुम्ही एक ग्लास गरम पाण्यात चमचाभर तूप घालून तेही घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com