Benefits Of Ghee: केसांना तूप लावण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Benefits Of Ghee

Benefits Of Ghee: केसांना तूप लावण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे...

शतकानुशतके तूप भारतीय घरांमध्ये विशेषतः आपल्या स्वयंपाकघरांचा एक भाग आहे. पूर्वीच्या काळी स्वयंपाकासाठी फक्त देशी तूप वापरले जायचे, परिष्कृत किंवा इतर कोणतेही तेल नव्हते. पण आज हेल्दी लाइफस्टाइलच्या नावाखाली लोक देशी  तूपापासून दूर पळतात.

आयुर्वेदातही तूपाचे अतिशय फायदेशीर वर्णन केले आहे, ज्यामध्ये त्याला 'योगवाहि' असे म्हटले आहे. योगवाहि म्हणजे तूप शरीरातील सात धतुस किंवा ऊतींमध्ये विविध औषधी गुणधर्म प्रसारित करते. इतकंच नाही तर विज्ञानानुसार तूपात अनेक प्रकारचे पोषक आणि गुणधर्म आढळतात, ज्यामध्ये अ आणि ई जीवनसत्त्वे मुख्य आहेत. आहारात तूपाचा समावेश करण्याचे अनेक फायदे आहेत. 

Ghee is beneficial for hair : तूप खाणे आपल्याच नाहीतर आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. तूप खाल्लांने आपले केस चांगले होतात. केस बहुधा कोरडे आणि निर्जीव होतात. तुपामुळे डोक्यातील कोंडा, फुटलेले केस, पांढरे केस या समस्या दूर होऊ शकतात. आजच्या लेखात आपण आपले केस खराब झाले असतील तर आपण केसांना तूप लावल्यामुळे काय फायदे होतात याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

हेही वाचा: Winter Recipe: नागपुरची स्पेशल खुसखुशीत पुडाची वडी कशी तयार करायची?

1) सध्या बहुतेक जवळपास सर्वच लोक कोंड्याच्या समस्येमुळे हैराण आहेत. काहीही केले तरी डोक्यातील कोंडा कमी होत नाही. जर तुमच्याही डोक्यात कोडा आहे तर तूप आणि बदाम तेलाने मालिश करावी .त्यामुळे डोक्यातील कोंडा नष्ट होण्यास मदत होईल.

2) जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागले तर तुम्ही तुमच्या केसांना चमकदार करण्यासाठी तूप वापरू शकता.

हेही वाचा: Kasuri Methi : हिवाळ्यात अशा प्रकारे तयार करा घरच्या घरी कसुरी मेथी; वर्षभर कामास पडेल

3) कोमट तूप घेऊन केसांची मालिश करून यानंतर, केसांवर लिंबाचा रस लावा आणि तसेच राहू द्या आणि नंतर केस धुवावे असे केल्याने तुमच्या केसांना मुलायमपणा येईल.

4) तूपातील स्प्लिट एण्ड्सचे पोषण करते, जे मुळात कमकुवत असतात. व्हिटॅमिन ए, डी, के 2, ई आणि अँटिऑक्सिडेंट्स सारख्या पोषक द्रव्यांसह समृद्ध तूप आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे.

हेही वाचा: Aloo Methi Bhaji Recipe : मुलं पालेभाज्या खात नाहीयेत? मग या पद्धतीने ट्राय करा बटाटा मेथी भजी रेसिपी

5) रात्रभर केसांची सखोल कंडिशनिंग करायची असेल तर तुम्ही तुमच्या केसांना तूप लावावे. मग शॉवर कॅपने डोके झाकून सकाळी उठून आपले केस धुवावे.

6) बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची वाढ होत नसेल तर तूपात आवळा आणि कांद्याचा रस मिसळा आणि मालिश करा.

7) तूप केसांना हायड्रेट करते. केसांमध्ये ओलावा कमी झाल्यामुळे केस निस्तेज व खराब होतात. अशा केसांसाठी तूप उत्तम उपाय आहे. त्यात आढळणारे हेल्दी फॅटी अॅसिड स्कल्पचे पोषण करून केसांच्या मुळांना हायड्रेट करतात.