
Dhanteras 2025 Wishes In Marathi:
Sakal
धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करून सोनं-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या सणाला अधिक खास बनवण्यासाठी नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना मराठीतून शुभेच्छा देऊ शकता. दिवाळीच्या या मंगलमय दिवशी तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि निरोगीपणाने बहरत राहो, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dhanteras 2025 Wishes: दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मात दिवाळीला खुप महत्व असून हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. वसुबारसनंतर धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा धनत्रयोदशी 18 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी धनाची देवता माता लक्ष्मी आणि भगवान कुबेराची मनोभावे पूजा केली जाते. तसेच सोनं-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या सणाला अधिक खास बनवण्यासाठी नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना मराठीतून खास शुभेच्छा देऊ शकता.